शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET Paper Leak Case: फायनल पेपरपर्यंत होती पोहोच! नीट पेपरफुटी प्रकरणातील पी. व्ही. कुलकर्णी याची संपूर्ण 'कुंडली' आली समोर
2
तेल संकटातून दिलासा मिळणार? अमेरिकेने रशियन तेलावरील सूट वाढवली; भारताला कसा होणार फायदा?
3
IPL Playoff Scenario: आरसीबी, एसआरएच, गुजरात प्लेऑफमध्ये; आता एका जागेसाठी ५ संघांमध्ये 'डू ऑर डाय'ची लढत!
4
Top Marathi News LIVE: श्वान प्रेमींच्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या, चावा घेणारी भटकी कुत्री जाणार 'शेल्टर होम'मध्ये
5
भारताच्या 'या' शेजारी देशात गरिबीचा हाहाकार! ४७ लाख लोक उपासमारीच्या छायेत, मुलं विकण्याची आली वेळ!
6
विधानसभा अध्यक्षांचा ‘प्रस्ताव’ बेस्टकडून माघारी पाठविण्यात आला, प्रवाशांच्या हिताविरोधात असल्याचा आरोप
7
एकाच महिलेचे ४ प्रियकर; सुपारी देऊनही नवरा वाचला, उशीने तोंड दाबून बेडवरच संपवला! ऐकून अंगावर येईल काटा
8
NEETच्या नावाखाली लाखोंचा खेळ! RCC क्लासमध्ये प्रवेशासाठी किती फी? मोटेगावकरच्या कमाईचे धक्कादायक आकडे समोर
9
'तेरे नाम'मधली निर्जरा आजही दिसते सुंदर, २५ वर्षांचा अनुभव केला शेअर; पण कुठे कमी पडली?
10
अमेरिकेची दादागिरी चालणार नाही; भारत रशियाकडून तेल खरेदी करणारच, सरकारचा स्पष्ट संदेश
11
सेल्फी, लॅप ऑफ ऑनर आणि MS धोनी-रैना जोडीची खास भेट; चेपॉकवरील भावूक क्षण (VIDEO)
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी पुन्हा विध्वंसाची भाषा; म्हणाले, "चर्चा यशस्वी झाली नाही, तर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला करू"
13
शिवराज मोटेगावकरच्या अटकेनंतर ‘सीबीआय’चा महाराष्ट्रातील मुक्काम वाढला, तपासणी सत्र सुरूच!
14
समुद्रात दादागिरी! इराणने 'होर्मुझ स्ट्रेट'वर लागू केला स्वतःचा कायदा; एका जहाजाकडून वसूल करताहेत 'इतके' कोटी
15
Fuel Price Hike: मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; पाहा मुंबई, पुण्यातील आजचे वाढलेले दर...
16
"माझ्या शांततेला कमजोरी समजू नका, मी लवकरच परतणार!" शेख हसीना यांचा बांगलादेशला थेट इशारा
17
माणुसकी उरली नाही! भररस्त्यात जोडप्याला बांबूने बेदम मारहाण अन् आजूबाजूला बघ्यांची गर्दी, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
18
अधिक मास २०२६: अधिक महिन्यात विवाहित मुलीने आईची ओटी का भरावी? सविस्तर वाचा
19
मधुचंद्राच्या रात्री असं काय घडलं की नवरदेवाने दुसऱ्याच दिवशी आयुष्य संपवलं? नवरीसह ४ जणांवर गुन्हा दाखल!
20
२७ एप्रिललाच नीटचा लीक पेपर नाशिकमध्ये पोहोचला, मिळताच शुभम दोन दिवस नाशिकमधून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: बांधा एकच चंग; ‘गोकुळ’मध्ये महायुती ठेवा एकसंध; मुख्यमंत्र्यांचा कानमंत्र 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 16:29 IST

डोंगळेंसह सतेज पाटील गटाचे पाच जण अनुपस्थित

कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघ राज्यातील ताकदवान संघ असून, त्यामुळेच कोल्हापूर जिल्ह्यात सहकार चळवळ भक्कम झाल्याचे गौरवोद्गार काढत संघाच्या आगामी निवडणुकीत महायुती म्हणून एकसंध रहा, असा कानमंत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘गोकुळ’चे अध्यक्ष नविद मुश्रीफ यांच्यासह संचालक व नेत्यांना दिला.

वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार विनय काेरे, आमदार चंद्रदीप नरके यांच्यासमवेत अध्यक्ष मुश्रीफ, ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, ‘जनसुराज्य’चे समित कदम व संचालकांनी बुधवारी मुख्यमंत्री फडणवीस यांची ‘वर्षा’ निवासस्थानी भेट घेतली. यावेळी अध्यक्ष मुश्रीफ यांनी अंबाबाईची मूर्ती देऊन मुख्यमंत्र्यांचा सत्कार केला.

‘गोकुळ’कडून मुंबई, नवी मुंबई, पनवेल, वाशी परिसरात नवीन विस्तारित दुग्ध शाळेसाठी १५ एकरपर्यंत व पुणे येथे नव्या पॅकिंग स्टेशनसाठी औद्योगिक भूखंड उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. संबंधित औद्योगिक वसाहतीमध्ये शिल्लक जागेबाबतचा प्रस्ताव सादर करा, तत्काळ मंजुरी देण्याची ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांचीही सदिच्छा भेट घेण्यात आली.

डोंगळेंची दांडी, ‘सतेज’ समर्थक संचालकांची अनुपस्थिती

मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या सूचनेनुसारच अध्यक्षपदाचा राजीनामा देत नसल्याचे अरुण डोंगळे यांनी सांगितले होते. त्यातून अध्यक्ष निवडीचे राजकारण चांगलेच ढवळून निघाले होते. मात्र, दोघांच्या भेटीस डोंगळे यांनी दांडी मारली. आमदार सतेज पाटील गटाचे विश्वास पाटील, शशिकांत पाटील-चुयेकर हे उपस्थित होते. मात्र, बाबासाहेब चौगले, अंजना रेडेकर, बयाजी शेळके, प्रकाश पाटील, राजेंद्र मोरे यांच्या अनुपस्थितीची जिल्ह्यात चर्चा सुरू आहे.

गायीप्रमाणे म्हैस दुधालाही अनुदान द्या

शासनाने गाय दूध उत्पादकांना अनुदान दिले. मात्र, कोल्हापूर जिल्ह्यात म्हैस दूध उत्पादकांची संख्या लक्षणीय असल्याने त्यांनाही अनुदान मिळावे, अशी मागणीही ‘गोकुळ’तर्फे करण्यात आली.

मल्टीएअर टेरिफ पॉलिसीमधील अटी शिथिल करा

महाराष्ट्र विद्युत वितरण महामंडळाने २०२५ पासून राज्यात लागू केलेल्या सौरऊर्जा संदर्भातील मल्टीएअर टेरिफ पॉलिसीमुळे वाढलेला आर्थिक भार लक्षात घेता, या धोरणाच्या अटी व शर्तींमध्ये शिथिलता आणावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. सर्वच मागण्यांबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावण्याचे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.