शहरं
Join us  
Trending Stories
1
‘चुका तुमच्या आणि त्याचा भुर्दंड जनतेला का ?’ राज ठाकरेंचं पत्र, केंद्र सरकारला प्रश्न
2
Top Marathi News LIVE Updates: हिमंता बिस्वा सरमा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
3
Tamil Nadu Politics: अण्णा द्रमुकमध्ये फूट, षण्मुगम गटाने TVK ला दिला पाठिंबा, तामिळनाडूत मोठी उलथापालथ
4
जगात युद्धाचा भडका, अन् चीनची गुपचूप 'धान्य साठेबाजी'; भारतासाठी धोक्याची घंटा?
5
Ashok Kharat : भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ
6
अल्पवयीन प्रियकर-प्रेयसीला पकडलं, अमानुषपणे केस कापले अन् संपूर्ण गावातून धिंड काढून लावलं लग्न!
7
Pragya Singh Missing Case: ट्रेनमधून गायब झालेली नवरी सापडली, नवऱ्याच्या जीवात जीव आला! आता रेल्वे प्रशासन म्हणते.. 
8
हिमंता बिस्वा सरमांच्या शपथविधीसाठी एकनाथ शिंदे गुवाहाटीमध्ये, सरमांच्या नेतृत्वाचं कौतुक करत म्हणाले...  
9
भारतात पेट्रोलचा साठा संपणार? इंधनावर कोटा लागू होणार का? केंद्र सरकारने दिलं मोठं उत्तर
10
Prajakta Mali: प्राजक्ता माळीच्या कुटुंबात कोण कोण? अभिनेत्रीने शेअर केला फॅमिली फोटो
11
काय? राकेश बापटसोबत तेजश्री प्रधानच्या लग्नाची उडालेली अफवा, अभिनेता म्हणतो...
12
लग्नानंतर १४ व्या दिवशी नववधूचा मृत्यू; नवरा म्हणतो, "माझ्याशी मजा-मस्करी करत होती, अन्..."
13
जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश
14
रुपयाची ऐतिहासिक घसरण; डॉलरच्या तुलनेत आतापर्यंतच्या नीचांकी स्तरावर, जाणून घ्या महत्त्वाची कारणं
15
राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंना डच्चू? ते पत्र व्हायरल, सुनेत्रा पवार म्हणाल्या...
16
Video - "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
17
Wife च्या सोबत Post Office मध्ये उघडू शकता खातं, दर महिन्याला हमीसह मिळेल ₹८६३३ चं फिक्स व्याज
18
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा दणका! शाळा, मंदिरे आणि बसस्थानकांजवळील दारू विक्रीवर बंदी
19
शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी घसरण; आयटी शेअर्सना मोठा फटका, सेन्सेक्स-निफ्टी रेड झोनमध्ये
20
कोणतीही शक्ती भारताला झुकवू वा दबावाखाली आणू शकत नाही, पंतप्रधान मोदींचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

पतंगरावांची गाडी वसगडेत रोखली

By admin | Updated: January 11, 2015 00:38 IST

रास्ता रोको : ऊसप्रश्नी ‘स्वाभिमानी’चे कार्यकर्ते आक्रमक

भिलवडी : कोल्हापूर जिल्ह्याप्रमाणे सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी प्रती टन २५०० रुपयांवर पहिली उच्चल द्यावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने शनिवारी वसगडे (ता. पलूस) येथे सलग तीन तास कडकडीत रास्ता रोको आंदोलन केले. रस्तारोको दरम्यान, पोलीस बंदोबस्तात माजी मंत्री, आमदार डॉ. पतंगराव कदम यांची गाडीही संतप्त शेतक-यांनी रोखून ठेवली. आंदोलकांना न जुमानता कदम यांच्या गाडीने आपला मार्ग बदलल्याने संतप्त झालेल्या आंदोलकांनी साखरसम्राटांच्या निषेधाच्या तीव्र घोषणा दिल्या. यामुळे परिसरात काहीवेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सांगली जिल्हा युवा आघाडीचे अध्यक्ष संदीप राजोबा यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी सकाळी १० .३० वाजल्यापासून सांगली-पलूस रस्त्यांवर वसगडे गावच्या बसस्थानकासमोर रास्ता रोको आंदोलन केले. पलूस तालुक्यातील पाचशेंवर शेतकऱ्यांनी रस्त्यावर ठिय्या मांडला. याचवेळी पतंगराव कदम हे पोलिसांच्या पायलट वाहनांसह पलूसहून वसगडेमार्गे सांगलीला निघाले होते. दुपारी १२ वाजता गाडी वसगडे येथे आंदोलनस्थळी आली. त्यावेळी साखरसम्राटांचा धिक्कार असो,अशा घोषणा आंदोलकांनी दिल्या. पोलीस अधिकाऱ्यांनी खाली उतरून गाडीला रस्ता देण्याची मागणी केली. मात्र आंदोलकांनी गाडी सोडणार नसल्याचा पावित्रा घेतला, कदम यांनी खाली उतरून शेतकऱ्यांशी संवाद साधावा, अशी विनंती केली. कदम यांनी स्वता:च्या कारखान्यांचा दर जाहिर करुन ऊस दराची कोंडी फोडावी अशीही मागणी आंदोलकांनी केली. मात्र कदम खाली न उतरता त्यांनी गाडयांची दिशा बदलून पाचवा मैलमार्गे ते सांगलीकडे गेले. त्यामुळे संतप्त झालेल्या आंदोलकांनी साखरसम्राटांविरोधात तीव्र घोषणा दिल्या.
दुपारी १.३० वा. पलूसचे नायब तहसीलदार बिपीन लोकरे यांनी आंदोलन स्थळास भेट देऊन निवेदन शासनाला कळविण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनात स्वाभिमानीचे पलूस तालुका अध्यक्ष सूर्यकांत मोरे, सतीश पाटील, संतोष मोळाज, राजगोंड राजोबा, प्रमोद हजारे, सचिन सूर्यवंशी, लाला हजारे, सुधीर खोत, राजाभाऊ पाटील, संदीप पाटील, हणमंत पाटील आदीसह कार्यकर्ते सहभागी झाले. (प्रतिनिधी)