शहरं
Join us  
Trending Stories
1
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
2
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
3
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
4
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
5
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
6
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
7
मोदींच्या रोड शोमुळे मेट्रोसेवा बाधित; जागृतीनगर ते घाटकोपर मेट्रोसेवा दोन तास बंद
8
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
9
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
10
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
11
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
12
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
13
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
14
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश
15
व्यावसायिकाच्या घरावर पोलिसांच्या मदतीने दरोडा; निवडणुकीसाठीचा पैसा दडवल्याचा बनाव
16
खार, वांद्रे परिसरांत ६६ लाखांची रोकड जप्त; आचारसंहिता भरारी पथकाची कारवाई
17
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
18
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
19
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
20
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!

Kolhapur: जोतिबाच्या खेट्यांची सांगता; अडीच लाख भाविकांची हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2024 12:21 PM

जोतिबा : जोतिबा डोंगरावर भाविकांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात रविवारी पाचव्या खेट्यासह खेट्यांच्या यात्रेची सांगता झाली. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे ...

जोतिबा : जोतिबा डोंगरावर भाविकांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात रविवारी पाचव्या खेट्यासह खेट्यांच्या यात्रेची सांगता झाली. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सपत्नीक जोतिबाचे दर्शन घेतले.कोल्हापूर ते जोतिबा डोंगर अशा पायी प्रवासाने माघ पौर्णिमेनंतर येणाऱ्या रविवारपासून प्रत्येक रविवारी जोतिबाचे दर्शन घेतले जाते. २५ फेब्रवारीपासून खेटे सुरू झाले होते. पाचव्या खेट्याला सांगता झाली. सुमारे अडीच लाखांहून अधिक भाविकांनी श्रीजोतिबाचे गुलाल खोबऱ्याची उधळण करून दर्शन घेतले. शेवटच्या खेट्याला जोतिबाची सरदारी रूपात खडी पूजा बांधण्यात आली होती.कोल्हापूर शहराबरोबरच आता महाराष्ट्र, कर्नाटक राज्यातील भाविक ही मोठ्या श्रद्धेने खेटे यात्रेत सहभागी होत आहेत. रविवारी शेवटचा खेटा मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा झाला. यावेळी लाखो भाविक जोतिबा डोंगरावर दाखल झाले होते. कोल्हापूर, वडणगे, निगवे, कुशिरे गायमुख मार्गे ज्योतिबा मंदिरात भाविक चालत आले. चांगभलंच्या गजराने डोंगरघाट आणि मंदिर परिसर दुमदुमून गेला. रविवारी रात्रीपासून मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होती. दर्शनासाठी भाविकांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. कोडोलीचे पोलिस निरीक्षक कैलाश कोडग, मनोज कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त तैनात होता.रविवारी पहाटे ४ वाजता मंदिराचे दरवाजे उघडले. जिल्हाधिकारी यांनी श्रीक्षेत्र जोतिबा डोंगराला सपत्नीक भेट देऊन जोतिबाचे दर्शन घेतले. त्यांच्या हस्ते देवास अभिषेक घालण्यात आला. यावेळी पन्हाळा तहसीलदार माधवी शिंदे, देवस्थानचे सचिव सुशांत बनसोडे उपस्थित होते.सकाळी ११ वाजता धुपारती सोहळा पार पडला. या सोहळ्यात घोडे, उंट, वाजंत्री, पुजारी गावकरी सहभागी झाले होते. दरम्यान, होळी पूजन करून ती प्रज्वलित करण्यात आली. ज्योतिबाचा शेवटचा खेटा, होळी पौर्णिमा, सलग सुट्टी असल्याने अडीच लाखांहून अधिक भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला असल्याचे जोतिबा देवस्थानचे व्यवस्थापक धैर्यशील तिवले यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरJyotiba Templeजोतिबा