शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

थेट पाईपलाईन योजनेस जानेवारी २०२२ ची डेडलाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 19:58 IST

water scarcity Kolhapur : कोल्हापूर शहराची पुढील पंचवीस वर्षांची पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन राबविण्यात येत असलेल्या काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेचे काम जानेवारी २०२२ अखेरपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी शुक्रवारी ठेकेदारासह सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

ठळक मुद्देथेट पाईपलाईन योजनेस जानेवारी २०२२ ची डेडलाईन पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडून पाहणी, अधिकाऱ्यांची बैठक

कोल्हापूर : कोल्हापूर शहराची पुढील पंचवीस वर्षांची पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन राबविण्यात येत असलेल्या काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेचे काम जानेवारी २०२२ अखेरपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी शुक्रवारी ठेकेदारासह सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.काम करताना येत असलेल्या अडचणी आणि योजना लवकर पूर्ण करण्याचे बंधन लक्षात घेऊन धरणक्षेत्रातील कोणत्या कामांना किती प्राधान्य द्यायचे, ती कामे किती वेळेत पूर्ण करायची, याचा बारचार्ट तयार करून प्रत्येक आठवड्याला कामाचा आढावा महापालिका प्रशासकांनी घ्यावा, अशा सूचनाही पालकमंत्री पाटील यांनी या वेळी दिल्या.पालकमंत्री पाटील यांनी योजनेचे प्रमुख ठेकेदार, सल्लागार, महापालिका, जलसंपदा, महावितरण अधिकारी यांना सोबत घेऊन प्रत्यक्ष धरणक्षेत्रात जाऊन शुक्रवारी योजनेच्या कामापैकी जॅकवेल, इंटेकवेल, इन्स्पेक्शनवेल, कॉपरडॅम आदी कामांचा आढावा घेतला. त्यानंतर काळम्मावाडी गेस्ट हाऊसवर सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेतली. सुमारे तासभर चालेल्या या बैठकीत माजी निवृत्त अधिकारी व्ही. एस. नलवडे यांनी संबंधित सर्व अधिकाऱ्यांना कामाचा प्राधान्यक्रम, गती, तांत्रिक मुद्दे यांवर मार्गदर्शन केले.बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना पालकमंत्री पाटील यांनी योजनेचे काम कोठेपर्यंत आले आहे आणि ते केव्हा पूर्ण होणार याची माहिती दिली.  या वेळी आमदार ऋतुराज पाटील, प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, माजी महापौर निलोफर आजरेकर, माजी उपमहापौर संजय मोहिते, प्रकल्प अभियंता हर्षजित घाटगे, माजी नगरसेवक शारंगधर देशमुख, सचिन चव्हाण, मधुकर रामाणे, अर्जुन माने, सचिन पाटील, सुनील पाटील, अशपाक आजरेकर, माजी नगरसेविका माधुरी लाड, कोल्हापूर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर, उपअभियंता भाग्यश्री पाटील, कल्याणी कालेकर, प्रशांत कांबळे, शाखा अभियंता एच. बी. कुंभार उपस्थित होते.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलkolhapurकोल्हापूर