Kolhapur-Gokul Dudh Sangh: बात दूर-दूर तक जानीही चाहिये, ३५ साल का हिसाब होनाही चाहिये !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 14:02 IST2026-05-18T14:00:05+5:302026-05-18T14:02:05+5:30

विजयसिंह पाटील : तानाजी पाटील यांच्या पशुखाद्य ठेक्यासह अनेक विषय येणार बाहेर

It will be revealed how milk producers have been looted for the last 35 years, Vijaysinh Patil and organization representatives counterattack through a leaflet | Kolhapur-Gokul Dudh Sangh: बात दूर-दूर तक जानीही चाहिये, ३५ साल का हिसाब होनाही चाहिये !

Kolhapur-Gokul Dudh Sangh: बात दूर-दूर तक जानीही चाहिये, ३५ साल का हिसाब होनाही चाहिये !

कोल्हापूर : ‘गोकुळ’मध्ये ३५ वर्षे कारभार केलेल्यांनी गोरगरीब दूध उत्पादकांच्या पोरा-बाळांच्या तोंडचा घास काढून घेतला आणि स्वतःसह जावयांची घरे भरली. असे असताना "बात दूर-दूर तक जायेगी....." अशी वल्गना करत आहेत; पण "बात दूर तक जानीही चाहिये और ३५ साल का हिसाब होनाही चाहिये....! अशा शब्दांत विजयसिंह पाटील व संस्था प्रतिनिधींनी रविवारी पत्रकातून पलटवार केला आहे.

गायत्री कोल्ड स्टोअरेजबद्दल आक्षेप असेल, तर अध्यक्ष नविद मुश्रीफ यांनी कंपनीस दरवाढ का दिली? कुणाची नात औषध पुरवत आहे? कुणी संघाच्या पैशाने हॉटेल बांधले? याचीदेखील माहिती लवकरच बाहेर येईल, त्यामुळे ‘बात निकली है तो दूर तक जायेगी’ एवढं लक्षात ठेवावे, असा इशारा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तानाजी पाटील यांनी शनिवारी दिला हाेता.

त्यावर, विकास पाटील-कुरुकलीकर म्हणाले, जावयाला फायदा व्हावा या उद्देशाने आधीच चुकीचे ठराव केले. त्यांचा पॅकिंगचा ठेका रद्द करण्याची नोटीस दिल्यानंतर ते उच्च न्यायालयात गेले. न्यायालयाने नेमलेल्या लवादाने निर्णय दिल्याने संघाला इतकी मोठी किंमत मोजावी लागली. तानाजी पाटील यांचा पशुखाद्याचा ठेक्यासह अजून अनेक विषय बाहेर यायचे आहेत.

३५ वर्षे कशी लूट केली हे लवकरच समोर

किकवीमध्ये स्वमालकीच्या प्रकल्पातून सध्या दोन लाख लिटर दुधाचे पॅकिंग केले जाते, तेही अवघ्या प्रतिलिटर ४० पैशांत. जावयाला आजही एक रुपये साठ पैसे दर दिला जात आहे, लवकरच जावयांचा करार समाप्त संपणार आहे. गेल्या ३५ वर्षे दूध उत्पादकांची कशी लूट झाली, हे आपोआपच समोर येईल. असे दत्तात्रय पाटील (सिद्धनेर्ली) यांनी म्हटले आहे.

किकवीच्या प्रकल्प खरेदीची चौकशी कराच..

किकवीमधील प्रकल्पासाठी संचालक मंडळाने सहकार कायदा व सी. व्ही. सी. मार्गदर्शक तत्त्वांनुसारच जमीन खरेदी केलेली आहे. शासनाने या व्यवहाराची चौकशी करावी. म्हणजे यातून ‘गोकुळ’मध्ये गेल्या पाच वर्षांत पारदर्शी खरेदी केली जाते, हे समोर येईल, असे निवास पाटील (प्रयाग चिखली) यांनी म्हटले आहे.

‘गोकुळ’सदृश ब्रँडखाली दूध उचलण्याचा घृणास्पद प्रकार

गोकुळसारखेच नाव वाटणाऱ्या आपल्या स्वतःच्या मालकीच्या गोकुळसदृश ब्रँडला नाव देऊन ‘गोकुळ’चे दूध उचलण्याचा घृणास्पद प्रकारही याच जिल्ह्यात झाल्याचा आरोप विठ्ठल जाधव (दौलतवाडी) यांनी केला.

Web Title : गोकुल दुग्ध संघ घेरे में: 35 साल का हिसाब मांगा!

Web Summary : कोल्हापुर के गोकुल दुग्ध संघ पर भ्रष्टाचार और कुप्रबंधन के आरोप लगे हैं। रिश्तेदारों को लाभ पहुंचाने और संदिग्ध भूमि सौदों के जरिए धन निकालने के आरोप हैं। पिछले 35 वर्षों की जांच की मांग उठी, पशु आहार अनुबंधों और परियोजना खरीद के बारे में पलटवार भी सामने आए।

Web Title : Gokul Milk Union under fire: 35-year accounts demanded!

Web Summary : Kolhapur's Gokul Milk Union faces accusations of corruption and mismanagement. Allegations include siphoning funds to benefit relatives and questionable land deals. Demands for investigations into past 35 years arise, with counter-allegations surfacing regarding animal feed contracts and project purchases.