शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
2
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
3
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
4
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
5
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
6
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
7
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
8
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
9
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
10
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
11
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
12
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
13
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
14
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
15
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
16
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
17
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
18
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
19
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
20
“पंजाब स्फोटाबाबत भगवंत मान पाक ISIला क्लीन चिट का देतात, भाजपाशी एवढे वैर का?”: राघव चड्ढा
Daily Top 2Weekly Top 5

पाइपलाइनद्वारे स्वस्त गॅस मिळणे शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूरच्या विकासात भर घालणाऱ्या गॅस पाइपलाइन प्रकल्पामुळे शहरवासीयांना स्वस्त दरात घरगुती गॅस मिळणे शक्य ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कोल्हापूरच्या विकासात भर घालणाऱ्या गॅस पाइपलाइन प्रकल्पामुळे शहरवासीयांना स्वस्त दरात घरगुती गॅस मिळणे शक्य होईल, असा विश्वास खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मंगळवारी येथे बोलताना व्यक्त केला.

शहरातील ई-वॉर्ड परिसरात कदमवाडी -विजयनगर येथे गॅस पाइपलाइन टाकण्यात येत असून, त्याचा प्रारंभ मंगळवारी खासदार संभाजीराजे छत्रपती व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते. कोरोनाच्या सर्व प्रतिबंधक नियमांचे पालन करीत हा कार्यक्रम झाला.

खासदार संभाजीराजे म्हणाले, अनेक वर्षांपासून मी या योजनेचा पाठपुरावा करीत आहे. त्याच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. महानगरपालिकेच्या सर्व परवानग्या मिळाल्या असल्याने हा प्रकल्प लवकरच पूर्ण होईल. दिल्ली, मुंबई, पुण्यासारख्या शहरांत यशस्वी ठरलेली ही योजना कोल्हापूरच्या विकासातही अमूल्य योगदान देईल. शहरातील प्रत्येक कुटुंबाला या प्रकल्पाचा थेट लाभ होणार आहे. आज जर एक सिलिंडर ८०० रुपयांना मिळत असेल, तर तेवढाच गॅस आपल्याला ४०० ते ४५० रुपयांत मिळेल. जेवढा वापर तेवढेच पैसे आकारले जातील. गृहिणींना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. हॉटेल व्यावसायिक व अनेक उद्योगांना यामुळे स्वस्त इंधन मिळेल. किफायतशीर आणि स्वच्छ इंधनाचा भरपूर पुरवठा झाल्याने उद्योगवाढीसाठी याचा अतिरिक्त फायदा होणार आहे.

आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले, गॅस हवेपेक्षाही हलका असल्याने तो उडून जातो. चुकून लीक झाला तरी त्याचा स्फोट होत नाही. आपण अनेक वेळा पाहतो सिलिंडरचा अपघात होतो. सुरक्षेच्या दृष्टिकोनातूनही सिलिंडरपेक्षा अत्यंत सुरक्षित आहे, याचा स्फोट होण्याची शक्यता नसते. गॅस मिळण्यातील अडचणी दूर होणार आहेत.

प्रकल्प प्रमुख बी.एस. सोनवणे यांनी गॅस पुरवठा विनाखंड चोवीस तास सुरू ठेवला जाणार असल्याचे सांगितले. यावेळी माजी नगरसेवक सत्यजित कदम, संभाजी जाधव उपस्थित होते.

संपूर्ण शहरात पाइपलाइन टाकणार-

पहिल्या टप्प्यात ई-वॉर्डातील १० प्रभागांत पाइपलाइन टाकण्यात येत असून, पुढील टप्प्यात संपूर्ण शहरात ती टाकली जाईल. त्यानंतर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही पोहोचविण्याचा माझा प्रयत्न असल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले.

(फोटो देत आहे)