दत्तवाडमध्ये विस्तार अधिकाऱ्यांकडून तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:23 IST2021-02-10T04:23:54+5:302021-02-10T04:23:54+5:30

दत्तवाड : येथील गेली दहा दिवस बंद असलेले ग्रामविकास अधिकारी यांच्या कार्यालयाचे सील मंगळवारी विस्तार अधिकारी रवींद्र कांबळे यांनी ...

Investigation by extension officers in Dattawad | दत्तवाडमध्ये विस्तार अधिकाऱ्यांकडून तपासणी

दत्तवाडमध्ये विस्तार अधिकाऱ्यांकडून तपासणी

दत्तवाड : येथील गेली दहा दिवस बंद असलेले ग्रामविकास अधिकारी यांच्या कार्यालयाचे सील मंगळवारी विस्तार अधिकारी रवींद्र कांबळे यांनी प्रशासक गवंडी यांच्या उपस्थितीत काढून दप्तराची तपासणी केली.

दत्तवाड ग्रामपंचायतीच्या दोन महिन्यांतील आर्थिक व्यवहारात गैरव्यवहार आढळल्याचा आरोप करीत नूतन ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी ग्रामविकास अधिकारी यांचे कार्यालय सील केले होते. याबाबत गटविकास अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार देण्यात आली होती. या तक्रारीत दोन महिन्यांत झालेल्या विविध खरेदी व्यवहारात गैरव्यवहार झाल्याचे म्हटले होते. दहा दिवसांपूर्वीच त्यांचे कार्यालय सील करून सर्व कागदपत्रे बंद केली होती. या पार्श्वभूमीवर मंगळवारी विस्तार अधिकारी रवींद्र कांबळे, प्रशासक गवंडी यांनी ग्रामपंचायतीमध्ये भेट देऊन नूतन सदस्यांच्या उपस्थितीत कार्यालय सील काढून कागदपत्रांची तपासणी केली. याबाबतचा अहवाल सादर करण्यात येणार आहे, अशी माहिती विस्तार अधिकारी कांबळे यांनी दिली. यावेळी नूर काले, विवेक चौगुले, संजय पाटील, बसगोंडा पाटील, देवराज पाटील, प्रकाश चौगुले, प्रवीण सुतार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Investigation by extension officers in Dattawad