पोटनियमानुसार यादीची छाननी करण्याची सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:29 IST2021-08-12T04:29:14+5:302021-08-12T04:29:14+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक प्रक्रिया सहकार विभागाने सुरू केली आहे. बँकेच्या पोटनियमांनुसार ...

Instructions to scrutinize the list as per the bye-laws | पोटनियमानुसार यादीची छाननी करण्याची सूचना

पोटनियमानुसार यादीची छाननी करण्याची सूचना

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक प्रक्रिया सहकार विभागाने सुरू केली आहे. बँकेच्या पोटनियमांनुसार मतदार यादीची छाननी करण्याची सूचना मंगळवारी विभागीय सहनिबंधक कार्यालयाने बँकेच्या यंत्रणेला दिली आहे.

राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या निवडणुका घेण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. त्यानुसार कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. मंगळवारी विभागीय सहनिबंधक कार्यालयाने मतदार यादीच्या छाननीचे आदेश दिले आहेत. बँकेने छाननी करून यादी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे दिली जाणार आहे. जिल्हा उपनिबंधकांच्या पातळीवर त्या यादीची छाननी होणार आहे. त्यानंतर विभागीय सहनिबंधकांकडे यादी येईल. तिथेही छाननी होऊन प्रारूप यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. साधारणत: या प्रक्रियेसाठी दीड महिन्याचा कालावधी लागणार आहे.

दरम्यान, आज, बुधवारी सहकार प्राधिकरणाकडून जिल्हा बँकांच्या निवडणुकीबाबत मार्गदर्शन केले जाण्याची शक्यता आहे.

बँकेचा पोटनियम काय सांगतो.....

थकबाकीदार विकास संस्था आणि ठरावधारकही थकबाकीदार असेल तर मतदानाचा अधिकार नाही.

थकबाकीदार विकास संस्थेच्या पात्र सभासदाच्या नावावरील ठराव ग्राह्य धरला जाणार.

इतर थकबाकीदार संस्था मात्र अपात्रच.

अवसायनातील संस्था प्रतिनिधींना मतदानाचा अधिकार नाही.

Web Title: Instructions to scrutinize the list as per the bye-laws