शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

तावडेची कर्नाटक सीआयडीकडून चौकशी

By admin | Updated: September 8, 2016 00:54 IST

पानसरे, कलबुर्गी हत्याप्रकरण : अधिकाऱ्यांत समन्वय बैठक, तावडेला आज सत्र न्यायालयात हजर करणार

कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे याच्याकडे ‘एसआयटी’चे अधिकारी गेल्या चार दिवसांपासून कसून चौकशी करीत आहेत. बुधवारी सकाळी कर्नाटकचे राज्य गुन्हे अन्वेषणचे विशेष पोलिस महानिरीक्षक हेमंत निंबाळकर व ‘एसआयटी’च्या अधिकाऱ्यांची मुख्यालय परिसरातील ‘पोलिस क्लब’ इमारतीमध्ये तपासासंबंधी समन्वय बैठक झाली. यावेळी निंबाळकर यांनी संशयित तावडे याच्याकडे डॉ. एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येसंबंधी तीन तास स्वतंत्रपणे गोपनीय चौकशी केली. त्यानंतर ते टीमसह बेळगावला रवाना झाले. दरम्यान, तावडेच्या पाच दिवसांच्या पोलिस कोठडीची मुदत बुधवारी संपली. त्यामुळे त्याला आज, गुरुवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. व्ही. पाटील यांच्यासमोर हजर केले जाणार आहे. त्याच्या पोलिस कोठडीत वाढ करावी, अशी विनंती तपास अधिकारी सुहेल शर्मा करणार आहेत. पानसरे हत्येप्रकरणी तावडेकडे ‘एसआयटी’ची चार पथके स्वतंत्रपणे चौकशी करीत आहेत. तावडेच्या स्प्लेंडर मोटारसायकलीचा शोध घेण्यासाठी पथकांनी त्याच्या पनवेल येथील निवासस्थानावर व ‘सनातन’ आश्रमावर छापे टाकले असता मोटारसायकल मिळून आली नाही. ती गायब झाल्याने त्याच्यावरील संशय बळावला आहे. यासंबंधी तावडेकडे चौकशी केली असता तो माहिती देण्यास तयार नाही. पोलिसांना पानसरे हत्येसाठी वापरलेले पिस्तूल, मोटारसायकल व गोळी झाडणारे दोघे यांची माहिती तावडेकडून हवी आहे. या हत्येसंबंधी त्याला व समीर गायकवाडला पूर्ण माहिती आहे; परंतु ते यासंबंधी काहीच माहिती देत नसल्याने तपास पुढे सरकलेला नाही. पोलिसांना या तिन्ही गोष्टी हस्तगत करणे गुन्ह्याच्या दृष्ठीने महत्त्वाचे असल्याने त्यावर जास्त भर दिला आहे. दरम्यान, डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे व डॉ. कलबुर्गी यांच्या हत्यांची वेळ सकाळची आहे. रेकी करून त्यांची हत्या करण्यात आली आहे. तिन्ही गुन्ह्यांची पद्धत एकच आहे. तसेच आरोपीदेखील दोघेच आहेत. त्यांनी वापरलेले शस्त्र एकच असल्याचा अहवाल कर्नाटक फॉरेन्सिक लॅब पोलिसांनी दिला आहे.या अनुषंगाने गेल्या चार दिवसांत तावडेच्या चौकशीत डॉ. कलबुर्गी यांच्या हत्येसंबंधी काही माहिती पुढे आली आहे का, हे पाहण्यासाठी कर्नाटकचे विशेष पोलिस महानिरीक्षक हेमंत निंबाळकर बारा अधिकाऱ्यांच्या पथकासह सकाळी अकरा वाजता मुख्यालयातील ‘पोलिस क्लब’ येथे आले. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे, अप्पर पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्याशी त्यांनी तपासासंबधी समन्वय साधला. त्यानंतर निंबाळकर यांनी संशयित तावडेकडे डॉ. कलबुर्गी यांच्या हत्येसंबंधी सुमारे तीन तास चौकशी केली. यावेळी तावडेने त्यांना समाधानकारक माहिती दिली नसल्याचे सूत्रांनी सांगितले. कोठडीत त्रास होतोय...तावडेला भेटण्यासाठी त्याच्या वकिलांना सत्र न्यायालयाने परवानगी दिली आहे; परंतु गेले दोन दिवस पोलिसांनी अ‍ॅड. वीरेंद्र इचलकरंजीकर यांना भेट दिली नव्हती. बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास राजारामपुरी पोलिस ठाण्यात अ‍ॅड. इचलकरंजीकर यांना तावडेची भेट घालून दिली. यावेळी तावडेने आपणाला गेले चार दिवस ‘सीबीआय’चा पोलिस रवी पाटील व पोलिस निरीक्षक अमृत देशमुख मारहाण करीत आहेत. पोलिस कोठडीमध्ये विश्रांतीसाठी चटई दिली आहे. पांघरुणासाठी चादर दिलेली नाही. पोलिस महासंचालकांनी घेतली दखल संशयित डॉ. तावडे याला चौकशीदरम्यान मारहाण होत असल्याची तक्रार हिंदुत्ववादी संघटनांनी पोलिस महासंचालकांकडे बुधवारी केली. त्यावर महासंचालकांनी तावडेला मारहाण करू नये, त्याला सुरक्षा द्यावी, अशा सूचना ‘एसआयटी’च्या अधिकाऱ्यांना देऊ, अशी ग्वाही शिष्टमंडळाला दिली. यावेळी ह. भ. प. बापूमहाराज रावकर, वैभव राऊत, राजेंद्र सावंत, अ‍ॅड. संजीव पुनाळकर, प्रभाकर भोसले, नैना भगत, रमेश शिंदे उपस्थित होते, अशी माहिती अ‍ॅड. वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी दिली.