शहरं
Join us  
Trending Stories
1
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
2
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
3
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
4
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
5
“प्रियंका चोप्रामुळे राघव चड्ढा यांचा भाजपात प्रवेश”; नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नीचा मोठा दावा
6
धक्कादायक! नाशिक, अमरावतीसारखा प्रकार कोल्हापुरात; तरुणींचे Video बनवून ब्लॅकमेल, तरुणाला अटक
7
Budh Pradosh 2026: कर्जमुक्ती आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी २९ एप्रिलला न चुकता करा 'बुध प्रदोष' व्रत
8
Top Marathi News LIVE Updates: १ मेपासून मराठीची मोहीम सुरूच राहणार; मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
9
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
10
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
11
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
12
गोलsss... पंतप्रधान नरेंद्र मोदी सिक्कीमच्या तरुणांसोबत खेळले फुटबॉल, PHOTOS ची रंगली चर्चा
13
वाढदिवसासाठी Reel तयार करण्याच्या नादात युवकाने भलताच उद्योग केला; शेवटी हातात पडल्या बेड्या
14
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
15
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
16
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
17
‘RTE’ प्रवेश! पसंतीच्या शाळेसाठी पालकांची कोंडी; ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ, तरीही संभ्रम कायम
18
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
19
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
20
हृदयद्रावक! IPL सामना पाहून घरी परतणाऱ्या २ भावांवर काळाचा घाला; 'हिट अँड रन'मध्ये मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

नावीन्याची आस असणारा ध्येयवेडा शिक्षक

By admin | Updated: August 27, 2015 23:54 IST

आजरा तालुक्यातील देवर्डे या गावी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत काम करणाऱ्या सुतार यांनी १९८८ मध्ये विद्यामंदिर इटे या शाळेतून अध्यापनास सुरुवात केली

ज्योतीप्रसाद सावंत- आजरा केवळ शिक्षकीपेशा स्वीकारून ज्ञानदानाची आवड व विद्यार्थी घडविण्याची जिद्द बाळगून शिक्षणक्षेत्रात नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्याबरोबरच सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रांतही आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या सुनील वसंत सुतार यांचा राष्ट्रीय पुरस्कार मिळण्यापर्यंतचा प्रवास निश्चितच इतर शिक्षकांना दिशा देणारा असाच राहिला आहे.पदवीधर अध्यापक म्हणून आजरा तालुक्यातील देवर्डे या गावी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत काम करणाऱ्या सुतार यांनी १९८८ मध्ये विद्यामंदिर इटे या शाळेतून अध्यापनास सुरुवात केली. अध्यापनाचा प्रवास विद्यामंदिर काळगोंडवाडी (ता. चंदगड), विद्यामंदिर चितळे, केंद्र शाळा महागोंड, विद्यामंदिर देवर्डे असा राहिला. विद्यामंदिर चितळे येथे त्यांनी राबविलेला शिवकलादालनाचा प्रयोग, विज्ञानदिनाच्या माध्यमातून हाताळावयास दिलेली शैक्षणिक उपकरणे, योगासन शिबिर यामुळे सुतार यांच्या उपक्रमशीलतेकडे सहकारी शिक्षक व विद्यार्थ्यांसह पालकांनीही सकारात्मक दाद दिली.विद्यार्थ्यांकरिता प्रसिद्ध होणाऱ्या मासिक ‘ऋग्वेद’च्या संपादनाची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पेलली आहे. गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध व्हावे यासाठी आग्रही राहून ऋग्वेद रिलीफ फंड सुरू करून धनगरवाडे व लमाण वसाहतींमधील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. स्वत: वेळोवेळी रक्तदान करून इतरांना रक्तदान करण्यास प्रवृत्त करण्यात त्यांचा नेहमीच पुढाकार राहिला.शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये दिल्या जाणाऱ्या प्रश्नपत्रिका निर्दोष असाव्यात यासाठी प्रश्नपत्रिकांचा सखोल अभ्यास करून त्यातील त्रुटी शोधून कोणत्याही विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही, अशी ठाम भूमिका घेऊन शिक्षण मंडळाला विद्यार्थ्यांना चुकीचे प्रश्न दिल्याबद्दल त्या प्रश्नांचे गुण देण्यासाठी भाग पाडले आहे.शैक्षणिक उठाव, प्रौढ शिक्षण, कुटुंब नियोजन यांसारख्या कार्यक्रमांतही कर्तव्य भावनेने पुढाकार घेणाऱ्या सुतार यांचे कार्य निश्चितच राष्ट्रीय पुरस्काराला साजेसे असे राहिले आहे.आदर्शशिक्षकसुतार यांनी राबविलेले उपक्रम शिवकला दालन, विज्ञान कार्यशाळा, योगासन शिबिर, कादंबरी वाचन, हस्ताक्षर सुधारणा वर्ग, परिसर भेटी, शैक्षणिक सहली, हस्तलिखित, झिम्मा फुगडी, बोलका व्हरांडा, शैक्षणिक साहित्य निर्मिती, लेक वाचवा अभियान, साडेसहा लाखांचा शैक्षणिक उठाव.पुरस्कार व सन्मानआदर्श शाळा (विद्यामंदिर काळगोंडवाडी), स्वच्छ, सुंदर, हिरवी शाळा (चितळे), जिल्हा परिषद आदर्श शिक्षक (२००८), आदर्श शिष्यवृत्ती मार्गदर्शक (१९९६, २०१२), कुटुंब कल्याण उत्कृष्ट कार्य (२००४), शुद्धलेखनाविषयक कृती संशोधक उत्कृष्ट नवोदय मार्गदर्शन