शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर महापालिकेत बोंद्रे, जाधव, देशमुख, फरास बनले नवे गटनेते

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 18:02 IST

कोल्हापूर : महानगरपालिका सभागृहातील कामकाज शिस्तबद्ध, कायदेशीर तसेच सांघिक पद्धतीने होण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा भाग असलेल्या गटनेत्यांची निवड प्रक्रिया पक्षीय ...

कोल्हापूर : महानगरपालिका सभागृहातील कामकाज शिस्तबद्ध, कायदेशीर तसेच सांघिक पद्धतीने होण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा भाग असलेल्या गटनेत्यांची निवड प्रक्रिया पक्षीय पातळीवर पार पडली. सभागृहात त्या त्या पक्षाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या गटनेत्यांनी आता विभागीय आयुक्त कार्यालयाकडे आघाडी म्हणून नोंदणी करायची आहे. त्यापैकी काँग्रेस पक्षाने मंगळवारी आघाडीची नोंदणी केली.

महानगरपालिकेच्या सभागृहातील सर्वच कामकाज कायदेशीर पद्धतीने चालावे म्हणून आघाडीची नोंदणी करणे आवश्यक आहे. जे पक्ष त्यांच्या नगरसेवकांच्या नावासह नोंदणी करतील, त्या पक्षांना कायदेशीर संरक्षण मिळणार आहे. पक्षांतर बंदी कायद्याखाली सर्व नगरसेवक बांधले जाणार आहेत. ज्या पक्षाची अशी नोंदणी होणार नाही त्यांच्या नगरसेवकांना प्रत्येक निवडणुकीत वेगवेगळी भूमिका घेण्यास मुभा मिळणार आहे. ही नोंदणी गटनेत्याने करायची असते. त्यासाठी आधी गटनेता निश्चित करावा लागतो.

काँग्रेस पक्षाने दुसऱ्यांदा महापालिकेवर निवडून आलेल्या इंद्रजीत पंडितराव बाेंद्रे यांची काँग्रेसच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली. पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयात महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अर्हता नियम १९८७ मधील नियम तीन नुसार काँग्रेसच्या सर्व नगरसेवकांच्या गटाची नोंदणी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, सहआयुक्त चंद्रकांत खोसे व उपायुक्त प्रतिभा पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

भारतीय जनता पक्षाने त्यांच्या पक्षाच्या गटनेतेपदी ज्येष्ठ नगरसेवक मुरलीधर पांडुरंग जाधव यांची निवड केली आहे. शुक्रवारी सर्व नगरसेवकांची बैठक झाली, त्यावेळी गटनेता व सभागृह नेता कोणाला करायचे त्यांची नावे बंद लखोट्यात घालून देण्यास सांगण्यात आले होते. त्यानंतर बंद लखोटे महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाकडे पाठविले होते. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सोमवारी मुरलीधर जाधव यांची गटनेतेपदी निवड केली. तसे पत्र त्यांनी महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांना पाठविले.

महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिंदेसेनेच्या गटनेतेपदी ज्येष्ठ व अनुभवी नगरसेवक शारंगधर देशमुख व राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे गटनेते म्हणून आदिल फरास यांची निवड करण्यात आली आहे. प्रजासत्ताकदिनी या घोषणा करण्यात आल्या. भाजप, शिंदेसेना, राष्ट्रवादी यांची नोंदणी आज, बुधवारी होणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Municipal Corporation Appoints Bondre, Jadhav, Deshmukh, Faras as New Group Leaders

Web Summary : Kolhapur Municipal Corporation's key parties have appointed their group leaders: Bondre (Congress), Jadhav (BJP), Deshmukh (Shinde Sena), and Faras (NCP- Ajit Pawar). These appointments are crucial for legally binding party members and ensuring organized proceedings within the corporation. Registration with the divisional commissioner is underway.
टॅग्स :Kolhapur Municipal Corporation Electionकोल्हापूर महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६kolhapurकोल्हापूरMahayutiमहायुती