शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

आजरा तालुक्यात स्वातंत्र्यदिन उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:29 IST

आजरा : आजरा तालुक्यात सुवर्ण महोत्सवी स्वातंत्र्यदिन उत्साहात पार पडला. शासकीय ध्वजारोहण तहसीलदार विकास अहिर यांच्या हस्ते झाले. होनेवाडीत ...

आजरा : आजरा तालुक्यात सुवर्ण महोत्सवी स्वातंत्र्यदिन उत्साहात पार पडला. शासकीय ध्वजारोहण तहसीलदार विकास अहिर यांच्या हस्ते झाले. होनेवाडीत राजर्षी शाहू व्यायाम मंडळातर्फे मुलांना पोषणयुक्त खाऊचे तर शिवसेनेतर्फे पूरग्रस्त गावे गजरगाव, साळगाव, हत्तीवडेसह तालुक्यात धान्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी उत्कृष्ट सेवा बजावणारे उत्तूरचे मंडल अधिकारी प्रशांत गुरव, देवकांडगावचे कोतवाल ज्ञानदेव भादवणकर, झुलपेवाडीचे पोलीस पाटील अशोक लोहार यांचा सत्कार करण्यात आला.

पंचायत समितीमध्ये सभापती उदय पवार, आजरा पोलीस स्थानकामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी भांगे, आजरा ग्रामीण रूग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक फर्नांडिस, आजरा साखर कारखान्यात अध्यक्ष सुनील शिंत्रे, आजरा सूतगिरणीत अन्नपूर्णादेवी चराटी यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.

आजरा अर्बन बँकेत अध्यक्ष सुरेश डांग, जनता बँकेत अध्यक्ष मुकुंद देसाई, स्वामी विवेकानंद पतसंस्थेत अध्यक्ष जनार्दन टोपले, आजरा नगर पंचायतीत नगराध्यक्ष ज्योत्स्ना चराटी, गंगामाई वाचन मंदिरात अध्यक्ष डॉ. अशोक बाचूळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.

आजरा हायस्कूलमध्ये अशोक चराटी, व्यंकटराव हायस्कूलमध्ये जिल्हा परिषद उपाध्यक्ष जयवंत शिंपी यांच्या हस्ते, भादवणमध्ये गुणवंत विद्यार्थिनीच्या हस्ते ध्वजारोहण झाले.

उत्तूर परिसर ध्वजारोहण

उतूर : उत्तूर (ता. आजरा) येथील ग्रामपंचायतीत सरपंच वैशाली आपटे यांच्या हस्ते ध्वजोराहण झाले. यावेळी उपसरपंच सचिन उतूरकर, जिल्हा परिषद सदस्य उमेश आपटे, वसंत धुरे, मंडल अधिकारी प्रशांत गुरव, तलाठी कल्याण सोनावणे, महेश करंबळी, संजय उतूरकर, संभाजी कुराडे, सुधीर जाधव, दीपक कांबळे, जोतिबा पोवार, उषा चव्हाण, शांता खोराटे, ग्रामविकास अधिकारी आर. वाय. नुल्ले, आजी-माजी सैनिक, तरुण मंडळांचे कार्यकर्ते, शिक्षक, अंगणवाडी सेविका, मदतनीस, संस्थेचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.