शहरं
Join us  
Trending Stories
1
‘चुका तुमच्या आणि त्याचा भुर्दंड जनतेला का ?’ राज ठाकरेंचं पत्र, केंद्र सरकारला प्रश्न
2
Top Marathi News LIVE Updates: आसाममध्ये पुन्हा 'हिमंत' सरकार; आज शपथविधी
3
Pragya Singh Missing Case: ट्रेनमधून गायब झालेली नवरी सापडली, नवऱ्याच्या जीवात जीव आला! आता रेल्वे प्रशासन म्हणते.. 
4
भारतात पेट्रोलचा साठा संपणार? इंधनावर कोटा लागू होणार का? केंद्र सरकारने दिलं मोठं उत्तर
5
लग्नानंतर १४ व्या दिवशी नववधूचा मृत्यू; नवरा म्हणतो, "माझ्याशी मजा-मस्करी करत होती, अन्..."
6
जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश
7
अण्णाद्रमुक पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर?, विधानसभेत आमदारांमध्ये दोन गट; मुख्यमंत्री विजय यांना पाठिंबा देण्यावरून वाद
8
रुपयाची ऐतिहासिक घसरण; डॉलरच्या तुलनेत आतापर्यंतच्या नीचांकी स्तरावर, जाणून घ्या महत्त्वाची कारणं
9
राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंना डच्चू? ते पत्र व्हायरल, सुनेत्रा पवार म्हणाल्या...
10
Video - "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
11
Wife च्या सोबत Post Office मध्ये उघडू शकता खातं, दर महिन्याला हमीसह मिळेल ₹८६३३ चं फिक्स व्याज
12
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा दणका! शाळा, मंदिरे आणि बसस्थानकांजवळील दारू विक्रीवर बंदी
13
शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी घसरण; आयटी शेअर्सना मोठा फटका, सेन्सेक्स-निफ्टी रेड झोनमध्ये
14
कोणतीही शक्ती भारताला झुकवू वा दबावाखाली आणू शकत नाही, पंतप्रधान मोदींचे विधान
15
रणवीर सिंहचा ड्रीम प्रोजेक्ट! पडद्यावर साकारणार महादेवाची भूमिका; 'या' पुस्तकावर आधारित सिनेमा
16
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
17
Petrol Diesel Price: जागतिक बाजारपेठेत इंधनाचा भडका! जगातील अनेक देशांत पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले; भारताची नेमकी स्थिती काय?
18
पुरुषांमधील ब्रेन ट्युमरच्या वाढीला रोखण्याची क्षमता टेस्टोस्टेरॉनमध्ये; संशोधनकांना मोठे यश
19
केरळ मुख्यमंत्रिपदाचा वाद काँग्रेसच्या हायकमांडच्या दरबारात, आठवडा उलटला तरी नाव निश्चित नाही
20
आजचे राशी भविष्य: १२ मे २०२६: आर्थिक लाभ होईल, आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल
Daily Top 2Weekly Top 5

वीज उपकेंद्रांच्या संख्येत वाढ करणार

By admin | Updated: January 13, 2015 00:06 IST

क्षमता वाढविणार : नव्या योजनांची अंमलबजावणी झाल्यानंतर परिणाम शक्य

रत्नागिरी : ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित होऊ नये, यासाठी ठोस उपाययोजना म्हणून उपकेंद्रांची संख्या वाढविण्यात येणार आहे. शिवाय उपकेंद्राची क्षमता वाढवून ती एकमेकांशी जोडली जाणार आहेत. जेणेकरून वीजपुरवठा खंडित झाल्यास पर्यायी वीजपुरवठा तातडीने उपलब्ध होऊ शकेल.रत्नागिरी शहरात झाडगाव, हार्बर, नाचणेरोड व एमआयडीसी मिळून चार उपकेंद्र आहेत. हार्बर उपकेंद्र ज्यावेळी बंद पडते त्यावेळी निम्मे शहर अंधारात राहाते. भविष्यात ग्राहकांना अंधारात न ठेवण्यासाठी उपकेंद्र नव्याने उभारण्यात आलेल्या रहाटाघर उपकेंद्राशी जोडण्यात येणार आहेत. हार्बर, झाडगाव उपकेंद्रास महापारेषणच्या कुवारबाव उपकेंद्रातील ११० केव्ही वाहिनीवरून वीजपुरवठा होतो. संबंधित वाहिनीवर बिघाड झाल्यास चारही उपकेंद्र ठप्प होण्याचा धोका निर्माण होतो. त्यामुळे पर्यायी मार्गाने वीजपुरवठा मिळावा, यासाठी कुवारबाव महापारेषण उपकेंद्र निवळी केंद्राला जोडण्यात येणार आहे. रहाटाघर उपकेंद्राला ११० के. व्ही. फिनोलेक्स वाहिनीवरून वीजपुरवठा घेण्यात येणार आहे. तसेच रहाटाघर व हार्बर उपकेंद्र जोडले जाणार आहेत. शिवाय एमआडीसी व नाचणे उपकेंद्र निवळीला जोडली जाणार आहेत. जेणेकरून तातडीच्या वेळी पर्यायी वीज पुरवठा उपलब्ध होणार आहे. रहाटाघर उपकेंद्र जानेवारीअखेरी सुरू करण्यात येणार आहे.
महावितरणकडून पायाभूत आराखडा दोनअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यासाठी ६८ कोटी ६२ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून जिल्ह्यासाठी नवीन सहा उपकेंद्र मंजूर झाली आहेत. पायाभूत आराखडा एकमध्ये एकूण ८ उपकेंद्र मंजूर होती. पैकी पाच उपकेंद्र पूर्ण होऊन कार्यान्वित झाली आहेत. उर्वरित तीन उपकेंद्रांचे काम सुरू आहे. चिपळूण तालुक्यातील शिरगाव, धामणंद व गुहागर येथील उपकेंद्राचे काम सुरू आहे. कुवारबाव, साखरपा, चांदोर, हर्णै, भूम येथील उपकेंद्र कार्यान्वित झाली आहेत. आराखडा दोनमध्ये कोतवडे, पानवल, लोटे एमआयडीसी (खेड), कोळवली (शिवणे), वालोपे (चिपळूण), पालघर (मंडणगड) येथे उपकेंद्र मंजूर झाली असून, केवळ वालोपे उपकेंद्राला अद्याप जागा मिळालेली नाही. याशिवाय ३५२ किमी लघुदाब व ४१५ किमी उच्चदाब वाहिन्या, ३८२ नवीन रोहित्र बसविण्यात येणार आहेत. तसेच १५१ जुन्या रोहित्रांची क्षमता वाढविण्यात येणार आहे व उपकेंद्रात नवीन रोहित्र बसविले जाणार आहे.
कोकणात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडतो. याशिवाय डोंगरदऱ्यातून वाहिन्या गेल्यामुळे पावसाळ्यात वाहिन्या तुटणे, रोहित्र बिघाड किंवा जळणे, यांसारख्या अनेक समस्या उद्भवतात. उपकेंद्रावर लगतची अनेक गावे विसंबून असल्यामुळे याचा फटका संबंधित गावांना बसतो. त्यामुळे महावितरणने फिडरवरील ताण कमी होण्यासाठी नवीन उपकेंद्रांना मंजुरी दिली आहे. चाफे उपकेंद्रावर गणपतीपुळे, मालगुंड, नेवरे, धामणसे, ओरी, जाकादेवीसह आसपासची गावे समाविष्ट होतात. कोतवडे उपकेंद्रामुळे चाफे उपकेंद्राचा भार काही प्रमाणात कमी होणार आहे.

पावसाळ्यातील समस्येवर तोडगा
वीजपुरवठा खंडित झाल्यावर येथील व्यवसायावर परिणाम होत होता. परंतु कोतवडे उपकेंद्रावर गणपतीपुळे, मालगुंड, नेवरे, जांभरूण, खरवते, वेतोशी, मजगाव, बसणी, काळबादेवी आदी गावे अंतर्भूत करण्यात येणार आहेत. पावसाळ्यात समस्या उद्भवली, तर ती तत्काळ सोडविण्यास महावितरणला यश येणार आहे.