शहरं
Join us  
Trending Stories
1
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
3
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
4
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
5
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
6
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
7
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
8
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
9
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
10
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
11
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
12
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
13
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
14
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
15
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
16
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
17
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
18
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
19
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
Daily Top 2Weekly Top 5

अनुसूचित जमातीत समावेश करा

By admin | Updated: August 1, 2014 23:23 IST

धनगर समाजाची मागणी : इचलकरंजी प्रांत कार्यालयावर मोर्चा

इचलकरंजी : धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी येथील धनगर समाज आरक्षण कृती समितीच्यावतीने प्रांत कार्यालयावर आज, शुक्रवारी मोर्चा काढण्यात आला. यावेळी समाजातील एका संघटनेच्यावतीने ३ आॅगस्ट रोजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह विविध मंत्री कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. त्यांना जिल्हा बंदी करणार, अशी घोषणा मल्हार सेनेचे बबनराव रानगे यांनी भाषणात केली.धनगर समाज आरक्षण कृती समितीच्यावतीने आज येथील घोरपडे नाट्यगृह चौकातून मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये बकरी, ढोल, ओवी नृत्य अशा पारंपरिक गोष्टींचा समावेश करून मोर्चास सुरुवात झाली. हा मोर्चा मुख्य मार्गावरून फिरून प्रांत कार्यालय चौकात आला. चौकात घोषणा देत काही वेळ रास्ता रोकोही करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी मोर्चाला रस्ता रिकामा करून प्रांत कार्यालयात जाण्यास सांगितले. त्याप्रमाणे मोर्चा प्रांत कार्यालयावर आला. त्याठिकाणी मोर्चाचे सभेत रूपांतर झाले.सभेमध्ये मलकारी लवटे, संजय खोत, विठ्ठल चोपडे, नागेश पुजारी, कल्लाप्पा गावडे, अशोक आरगे, आदींची भाषणे झाली. यावेळी धनगर समाजाच्या २१ व्या शतकातील जीवनपद्धती, परंपरागत चालत आलेला व्यवसाय, याबाबत भाषणे करण्यात आली. तसेच सरकार आरक्षणाबाबत टाळाटाळ करीत असल्याचा आरोप करीत निषेधही नोंदविण्यात आला. चोपडे यांनी १५ आॅगस्टपर्यंत याबाबत निर्णय न घेतल्यास आगामी विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातील कॉँग्रेस व राष्ट्रवादी उमेदवारांच्या विरोधात प्रचार करण्याची घोषणा केली. यावेळी शंकरराव पुजारी, कोंडिबा बंडगर, विठ्ठल सुर्वे, दीपक सुर्वे, दत्तात्रय कुंभोजे, जीवन बरगे, रणजित जाधव, किशन पुजारी, संदीप कारंडे, आदींसह धनगर समाजातील बांधव उपस्थित होते. (प्रतिनिधी)