चिंचवाड येथील विविध विकासकामांचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:21 IST2021-02-08T04:21:07+5:302021-02-08T04:21:07+5:30

यावेळी आ. पाटील यांनी चिंचवाड ग्रामपंचायत कार्यालयाला भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. गावात विद्यार्थ्यासाठी केएमटी बस ...

Inauguration of various development works at Chinchwad | चिंचवाड येथील विविध विकासकामांचे उद्घाटन

चिंचवाड येथील विविध विकासकामांचे उद्घाटन

यावेळी आ. पाटील यांनी चिंचवाड ग्रामपंचायत कार्यालयाला भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. गावात विद्यार्थ्यासाठी केएमटी बस सुरू करावी, मुलांना खेळण्यासाठी मैदानाची सोय करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. यावेळी आ. पाटील यांचा नागरिकांच्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्या वंदना विजय पाटील, पंचायत समिती सदस्या शोभा राजमाने, माजी जि.प. सदस्य बाबासाहेब माळी, पंचायत समिती माजी सभापती प्रदीप झांबरे, विजय पाटील, रामचंद्र नांद्रे गुरुजी, सुभाष पाटील, दीपक मगदूम, प्रकाश पाटील, अनिल पाटील, सचिन जाधव, बाबा सरकार, सचिन पाटील, संदीप टिकणे, शबीर मुजावर, अमोल पाटील यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवाजी माळी, उमेश सुतार, सम्मेद पाटील, देवगोंडा पाटील, निखिल पोवार, बंटी जाधव, सनत कुमार पाटील धनंजय पाटील, वंदना प्रभाकर करुणासागर, अप्पालाल मुलाणी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

फोटो ओळ- चिंचवाड, ता. करवीर येथे विविध विकास कामांचे उद्घाटन आ. ऋतुराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जि.प. सदस्या वंदना पाटील व पं.स. सदस्या शोभा राजमाने, प्रदीप झांबरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Inauguration of various development works at Chinchwad