शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत मशिदीत अंदाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
2
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
3
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
4
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
6
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
7
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
8
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
9
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
10
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
11
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
12
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
13
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
14
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
15
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
16
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
17
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
18
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
19
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
20
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकीस्वारांसाठी महत्वाची बातमी; ..अन्यथा हायवेवर होईल एक हजारांचा दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 18:23 IST

अत्याधुनिक रडार यंत्रणेच्या इंटरसेप्टर वाहनांद्वारे कारवाई

कोल्हापूर : जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गावर गेल्या सात दिवसांपूर्वी ‘नो हेल्मेट, नो एंट्री’ अभियानाचे प्रबोधन आता संपले आले. आजपासून (सोमवार) राष्ट्रीय महामार्गावरील किणी टोल नाका येथे प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रत्यक्षात कारवाईला सुरुवात करणार आहे. अत्याधुनिक रडार यंत्रणा असलेल्या इंटरसेप्टर वाहनांद्वारे ही कारवाई केली जाणार आहे. हेल्मेट नसलेल्यांना एक हजार रुपयांचा दंड केला जाणार आहे.

प्रादेशिक परिवहन विभागाकडून ‘नो हेल्मेट, नो एंट्री’ प्रबोधनाची मोहीम आठवडाभर राबविली. त्यात १२०० वाहनांची तपासणी झाली असून ४३५ वाहनधारकांनी हेल्मेट घातले नसल्याचे निदर्शनास आले. ‘हेल्मेट वापरा, जीवन वाचवा’ असा संदेश देऊन मोहिमेत हेल्मेट परिधान केलेल्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले, तर हेल्मेट नसलेल्यांचे मी हेल्मेट वापरणार, अशा आशयाचा फलक त्यांच्या हाती देऊन छायाचित्र घेऊन प्रबोधन केले.

आता ही प्रबोधन मोहीम थांबणार असून हेल्मेट नसलेल्या वाहनधारकांवर कारवाई केली जाणार आहे. राष्ट्रीय महामार्गावर दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या वाहनांवरील दोघांनाही हेल्मेट परिधान करावे लागणार आहे.

हेल्मेट सक्ती का?

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये रस्ते अपघाताचे प्रमाण वाढले आहे. विशेषतः दुचाकी वाहनांच्या अपघातांत वाढ झाल्याचे निदर्शनास आले. त्यात हेल्मेटचा वापर न केल्यामुळे डोक्याला गंभीर दुखापत होऊन जीवितहानी झाल्याचे आढळून आले आहे. या पार्श्वभूमीवर ही मोहीम राबविली जात आहे.

पहिल्या टप्प्यात किणी टोल नाका

कारवाईसाठी पहिल्या टप्प्यात किणी टोल नाका येथे प्रत्यक्ष कारवाईची सुरुवात केली जाणार आहे. त्यानंतर कागल येथील आरटीओ तपासणी नाका येथे कारवाईला सुरुवात केली जाणार आहे. त्या ठिकाणी दोन मोटारवाहन निरीक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे.

रडार यंत्रणेची वैशिष्ट्ये

  • इंटरसेप्टर वाहनांत रडार यंत्रणा, वाय- फाय, एनपीआर कॅमेरा.
  • एनपीआर, कॅमेऱ्यामध्ये इन्फ्रारेड तंत्रज्ञानाने रात्रीच्या वेळेसही प्रभावी कारवाई.
  • अधिकाऱ्यांना कारवाईसाठी एक विशिष्ट क्षेत्र निश्चित करावे लागणार.
  • रडार प्रणालीद्वारे वाहनांच्या हालचालींवर स्वयंचलित पद्धतीने नजर.
  • नियमभंग वाहनचालकांवर ऑटोमॅटिक दंड.


आठ कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

  • वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर जरब बसवण्यासाठी इंटरसेप्टर वाहने कोल्हापूर परिवहन कार्यालयाला मिळाली.
  • यावर अत्याधुनिक रडार यंत्रणा २ बसविली आहे. यंत्रणेच्या हाताळणीचे प्रशिक्षण आठ मोटार वाहन निरीक्षक, सहायक मोटार वाहन निरीक्षकांना दिले आहे.

दोन अत्याधुनिक रडार यंत्रणा असलेल्या इंटरसेप्टर वाहनांद्वारे कारवाई होईल. हेल्मेट नसल्यास एक हजार रुपयांचा दंडाची पावती केली जाईल. हा दंड भरला नसल्यास परिवहन विभागाकडील त्या वाहनधारकांचे कोणतेही काम होणार नाही. - संजीव भोर, प्रादेशिक परिवहन अधिकारी

English
हिंदी सारांश
Web Title : Important News for Bikers: ₹1000 Fine on Highway Without Helmet

Web Summary : Kolhapur enforces helmet rule on highways. ₹1000 fine for no helmet. Advanced radar system to be used. The initiative aims to reduce accidents and fatalities caused by head injuries. Enforcement starts at Kini toll plaza, then RTO check post.