महत्त्वाची निधन वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:49 IST2020-12-05T04:49:23+5:302020-12-05T04:49:23+5:30

कोल्हापूर : जुना बुधवार पेठेतील श्रीराम आनंदराव झेंडे-मोहरेकर (वय ८३) यांचे बुधवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, मुलगी, ...

Important news of demise | महत्त्वाची निधन वार्ता

महत्त्वाची निधन वार्ता

कोल्हापूर : जुना बुधवार पेठेतील श्रीराम आनंदराव झेंडे-मोहरेकर (वय ८३) यांचे बुधवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या, शुक्रवारी आहे.

श्रीराम झेंडे यांनी छत्रपती चॅरिटेबल देवस्थान ट्रस्टचे व्यवस्थापक, राजर्षी शाहू वैदिक स्कूल आणि तुळजाभवानी देवस्थानमध्ये सदस्य म्हणून अनेक वर्षे जबाबदारी सांभाळली होती. सध्या ते न्यू पॅलेस (नवीन राजवाडा)मधील छत्रपती शहाजी महाराज ट्रस्टच्या शेरी जमीन विभागात सक्रिय होते. झेंडे कुटुंबीय १७७७ पासून छत्रपती घराण्याच्या सेवेत सक्रिय आहे. ते रणजित झेंडे यांचे वडील होत. बुधवारी सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शाहू छत्रपती, ‘पुढारी’चे मुख्य संपादक डाॅ. प्रतापसिंह जाधव, माजी आमदार मालोजीराजे, ॲड. राजेंद्र चव्हाण, क्रिडाईचे विद्यानंद बेडेकर, आदी मान्यवर उपस्थित होते.

फोटो : ०२१२२०२०-कोल-श्रीराम झेंडे (निधन)

Web Title: Important news of demise