शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून एकावर गोळीबार, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
2
Top Marathi News LIVE Updates: १५ लाखांपेक्षा जास्त मेडिकल दुकानांना कुलूप! औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप 
3
Jinping on Iran War: इराण युद्ध थांबवण्यासाठी चीनचा पुढाकार, शी जिनपिंग यांनी दिला चार मुद्द्यांचा प्रस्ताव
4
Twisha Sharma : ट्विशा शर्माचा कॉल कट होण्यापूर्वी आईने ऐकलेला आवाज; गच्चीवर तासाभरात नेमकं काय घडलं?
5
"खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलू नका, फक्त क्रिकेटवर लक्ष द्या" रियान पराग समालोचकांवर भडकला!
6
अधिक मास २०२६: १ मंत्र ११ वेळा जपा, अशक्यही शक्य होईल; स्वामी सेवा तारेल, अद्भूत अनुभव येईल!
7
दुचाकीच्या धडकेनंतर लक्झरी बसने घेतला पेट, बाळापूर शेगाव मार्गावरील घटना
8
Twisha Sharma : "३० लोक बोलावून मारहाण करीन"; आता ट्विशा शर्माच्या वहिनीने उघड केला सासरच्यांचा क्रूर चेहरा
9
नवी मुंबई हादरली! घणसोलीत रिक्षाचालकांच्या हाणामारीत मध्यस्थी करणाऱ्या तरुणाची हत्या; दोन आरोपींना अटक
10
सांगा..मुंबई कशी तुंबणार नाही! नालेसफाईवेळी नाल्यात सापडला चक्क रिक्षाचा सांगाडा अन् भलीमोठी लोखंडी कचरापेटी
11
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
12
मनोज जरांगेंकडून प्रसाद लाड यांना चर्चेचं निमंत्रण; गावागावांतील बैठका २३ तारखेपर्यंत स्थगित, दिला 'हा' इशारा
13
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
14
हा निव्वळ भास नाही! तुमच्यातल्या 'सिक्स सेन्स'ची जागृती दर्शवणारे 'हे' १० बदल अनुभवलेत का?
15
ऑनलाइन कंपन्यांविरोधात औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप! १५ लाखांहून अधिक मेडिकल दुकाने बंद
16
Giorgia Meloni: बारटेंडर ते देशाच्या पंतप्रधान; जाणून घ्या इटलीच्या PM जॉर्जिया मेलोनी यांची न ऐकलेली कहाणी
17
Twisha Sharma : 'लिगेचर रिपोर्ट' समोर आल्याने मृत्यूचे कारण स्पष्ट; पण संशयाची सुई अजूनही सासरच्यांवर!
18
गोव्यात कमी किमतीत पेट्रोल विसरा, दराने ओलांडली शंभरी; डिझेल ९० पैशांनी महाग, ताजे रेट पाहा
19
'Welcome to Rome, my friend' म्हणत पंतप्रधान मेलोनींनी केले स्वागत, PM मोदींनीही शेअर केले रोममधील भेटीचे फोटो
20
"...तर मीदेखील मेलो असतो", 'नटसम्राट'बद्दल नाना पाटेकरांनी केलेल्या वक्तव्याने उंचावल्या भुवया, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

पगारी पुजारी कायदा अंमलबजावणी करा अन्यथा, पुजारी हटाव आंदोलन; कोल्हापूर शहर व जिल्हा नागरिक कृती समितीचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 15:51 IST

पुजाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा

कोल्हापूर : कोल्हापूरच्या अंबाबाईसह जोतिबा मंदिरात पगारी पुजारी नियुक्तीचा कायदा करून ८ वर्षे झाली त्याची अंमलबजावणी झालेली नाही. हा कायदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीतच मंजूर झाला. प्रत्यक्ष कृती झालेली नाही हे बहुदा शासन विसरलेले दिसते. तरी मुख्यमंत्र्यांनी तातडीने याबाबत महाराष्ट्रातील जनतेपुढे जाहीर खुलासा करावा, अशी मागणी कोल्हापूर शहर व जिल्हा नागरिक कृती समितीने केली आहे. अन्यथा शासनाला टोलसारख्या आंदोलनाप्रमाणे पुजारी हटाव आंदोलनाला तोंड द्यावे लागेल असा इशारा दिला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आठ वर्षांपूर्वी पगार देऊन पुजारी नेमणूक करण्याचा कायदा पास केला. जनतेने या कायद्याचे स्वागत केले. विशेषतः कोल्हापूरच्या आई अंबाबाई मंदिरात व जोतिबा मंदिरामध्ये तातडीने पगारी पुजारी नेमून या मंदिरात देश व परदेशातील भाविक आई अंबाबाईच्या व जोतिबाच चरणी जे धन दान करतात ते सर्व धन सरकार जमा करून मंदिराच्या भाविकांच्या सोयी सोयी-सुविधांसाठीच वापरण्यात यावेत, अशी आमची मागणी आहे.

टोलविरोधी आंदोलनात जनरेट्या पुढे शासनास माघार घ्यावी लागली होती याची जाणीव ठेवून अंबाबाई व जोतिबा मंदिरात तातडीने पगारी पुजारी नेमणूक कायद्याची अंमलबजावणी करावी अन्यथा शासनाला टोलसारख्या आंदोलनाप्रमाणे पुजारी हटाव आंदोलनाला तोंड द्यावे लागेल. असा इशारा अशोक पोवार, रमेश मोरे, दिलीप देसाई, अजित सासणे, राजाभाऊ मालेकर, चंद्रकांत सूर्यवंशी, प्रकाश आमटे, महेश जाधव, चंद्रकांत यादव, लहुजी शिंदे, विजय शिंदे, प्रसाद बुलबुले, महादेव जाधव, अमृत शिंदे, स. ना. जोशी . प्रा. शिवाजी पाटील, अण्णा देशपांडे, सदानंद सुर्वे, राजेश वरक, विनोद डुणूंग, चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.

पुजाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा

जोतिबा डोंगर येथे काही भाविकांना पुजारी रूपातील दरोडेखोर गुंडांनी केलेल्या मारहाणीची चौकशी करावी. आज अखेर दोषींवर कारवाई का केली नाही याचाही खुलासा पोलिस प्रशासनाने करावा. अशा प्रवृत्तीच्या पुजाऱ्यांना शासनाने अभय देऊ नये तातडीने त्यांच्यावर खुनाचा प्रयत्न करणे अशा कडक कलमांचा गुन्हा नोंद करून कारवाई करावी, अशी मागणीही कृती समितीने केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Implement paid priest law or face protests: Kolhapur citizens warn.

Web Summary : Kolhapur citizens demand immediate implementation of the paid priest law at Ambabai and Jotiba temples. Failure to do so will result in protests, similar to the toll agitation. Action is also sought against priests accused of assaulting devotees.