शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
3
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
4
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
5
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
6
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
7
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
8
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
9
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
10
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
11
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
12
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
13
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
14
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
15
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
16
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
17
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
18
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
19
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
20
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

corona virus-परदेशातून परतणाऱ्यांनी होम कोरोंटाईन करून घ्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 18:25 IST

परदेश तसेच जिल्ह्याबाहेरून प्रवास करून जिल्ह्यात आलेल्या नागरिकांनी आरोग्य तपासणी करून १४ दिवस घरीच स्वत:ला होम कोरोंटाईन करून घेऊन सुरक्षित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले आहे.

ठळक मुद्देपरदेशातून परतणाऱ्यांनी होम कोरोंटाईन करून घ्यावेजिल्हाधिकारी दौलत देसाई यांचे आवाहन

कोल्हापूर : परदेश तसेच जिल्ह्याबाहेरून प्रवास करून जिल्ह्यात आलेल्या नागरिकांनी आरोग्य तपासणी करून १४ दिवस घरीच स्वत:ला होम कोरोंटाईन करून घेऊन सुरक्षित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले आहे.जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली असून, आवश्यक उपाययोजना राबविण्यास प्राधान्य दिले आहे. त्या अनुषंगानेच बाहेरून येणाऱ्या नागरिकांमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण असल्याने या व्यक्तींनी घरातच राहणे योग्य आहे, असे जिल्हाधिकारी देसाई यांनी आपल्या जनतेसाठी काढलेल्या निवेदनात म्हटले आहे.जिल्ह्यात बाहेरून तसेच परदेश प्रवास करून काही लोक आले आहेत, येत आहेत, येणार आहेत. याबरोबरच मुंबई, पुणे व राज्याच्या अन्य काही भागांतून लोक स्वत:च्या मूळ गावी येत आहेत. बाहेरून आलेल्या लोकांच्या तपासणीची सोय छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात केली आहे.

डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार अशा व्यक्तींनी शक्यतो घराबाहेर पडू नये. ज्यांना होम कोरोंटाईन सल्ला दिला आहे, त्यांनी आपल्या घरामध्येच सुरक्षित राहावे, जेणेकरून कोरोना विषाणूचा संसर्ग इतरांना होणार नाही.

बाहेरून येणाऱ्या व्यक्तींनी इतरांशी संपर्क टाळावा; जेणेकरून आपल्या कुटुंबातील अन्य व्यक्ती, समाज व कोल्हापूर जिल्हा कोरोना या विषाणूपासून सुरक्षित ठेवता येईल. यासाठी अशा व्यक्तींनी घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन देसाई यांनी केले. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर