शिरोळमध्ये कारवाईनंतरही अवैध धंदे जोमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:20 IST2021-02-08T04:20:40+5:302021-02-08T04:20:40+5:30

शिरोळ : पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंदे बंद करण्याचे आदेश वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून देण्यात आले होते. मात्र, वरिष्ठांच्या आदेशाला ...

Illegal trades flourish in Shirol | शिरोळमध्ये कारवाईनंतरही अवैध धंदे जोमात

शिरोळमध्ये कारवाईनंतरही अवैध धंदे जोमात

शिरोळ : पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंदे बंद करण्याचे आदेश वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून देण्यात आले होते. मात्र, वरिष्ठांच्या आदेशाला न जुमानता शिरोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत मटका, जुगार, अवैध दारू विक्री खुलेआम सुरू आहे. याकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष दिसून येत आहे.

शिरोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत पंधरा गावांचा समावेश असून ग्रामीण भागाबरोबरच शिरोळ शहरामध्येही मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू असल्याचे दिसून येत आहे. बिनदिक्कतपणे व कोणाचीही भीती न बाळगता मटका खुलेआम सुरू आहे. औद्योगिक वसाहतीत तर मटक्याची दुकाने थाटण्यात आली आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाकडून कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे, तर स्थानिक पोलिसांनी गांधारीची भूमिका घेतली असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

अवैध व्यवसायांवर कारवाई केल्याचे पोलिसांकडून सांगितले जात असले तरी काही बीट अंमलदार व कलेक्टरांमुळे हा व्यवसाय पुन्हा सुरू झाला असल्याचे बोलले जात आहे. अवैध धंदे छुप्या मार्गाने सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत असले तरी, वरिष्ठांनी लक्ष देऊन या अवैध धंद्यांना आळा घालण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.

Web Title: Illegal trades flourish in Shirol