शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? मोदी सरकारनं दिले मोठे संकेत!
2
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
3
Top Marathi News LIVE Updates: मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारला मोठं 'बळ', बहुमत चाचणीआधी तामिळनाडूत मोठी घडामोड
4
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
5
संतापजनक! पिझ्झा तयार करताना थुंकायचा; किळसवाणा Video व्हायरल, लोकांनी बेदम चोपलं
6
सोनं खरेदी करू नका, असं आवाहन इंदिरा गांधींनी खरंच केलं होतं का?; व्हायरल कात्रणामागचं सत्य काय?
7
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
8
Travel : भारताच्या 'मिनी थायलंड'पासून अवघ्या ३ तासांवर आहे 'हे' सुंदर ठिकाण; निसर्गात रमून थकवा विसराल!
9
‘सनातन धर्माला संपवलंच पाहिजे’, विजय यांच्यासमोर उदयनिधींचं विधान, मुख्यमंत्र्यांनी दिला असा प्रतिसाद
10
कल्याणमध्ये ७८ वर्षीय भोंदूबाबाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
11
NEET Exam Paper Leak : "पप्पा, हाच पेपर येईल, हॉस्टेलमधील मुलींना द्या"; NEET चं केरळ कनेक्शन, १८० पैकी १३० प्रश्न लीक
12
कान्समध्ये अवतरली जणू स्वप्नातील परी! मिंट-ग्रीन गाऊनमध्ये आलिया भट्टचा 'प्रिन्सेस लूक' व्हायरल
13
Vastu Shastra: घरात पैसे टिकत नाहीत? मग चुकूनही 'या' दिशेला ठेवू नका तुमची तिजोरी!
14
सीजफायरचा फक्त देखावा! इराणने रशिया-चीनकडून जमवला शस्त्रास्त्रांचा डोंगर; 'या' देशांना दिला इशारा
15
ज्याने कपाटात 'सीक्रेट' कप्पा बनवला, त्यानेच हात साफ केला! ३० लाखांची चोरी करून कारागिर फरार
16
Gold Import: सोन्याच्या आयातीमुळे देशाच्या तिजोरीवर पडला मोठा भार, सोन्याने भारताची चिंता का वाढवलीये?
17
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
18
बुधवारी अपरा एकादशी २०२६: ‘असे’ करा व्रत पूजन, शुभ मुहूर्त काय? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
अनधिकृत बाइक टॅक्सी ॲप्सवर कारवाईचे आदेश; प्रताप सरनाईक यांचे सायबर क्राइम विभागाला पत्र
20
देश प्रथम! PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद; मंत्री शंभूराज देसाईंचा लंडन-पॅरिस दौरा रद्द
Daily Top 2Weekly Top 5

खुमखुमी असेल तर फौजदारी कराच !

By admin | Updated: January 10, 2015 00:43 IST

‘के. पी.’चे सरकारला प्रतिआव्हान : पॅकेजचा ‘शब्द’ पाळा; अन्यथा जिल्हाधिकाऱ्यांच्या दारात ऊस; जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या अडचणींबाबत बैठक

कोल्हापूर : एकीकडे साखर उद्योग अडचणीत असल्याचे मान्य करायचे, पॅकेजची घोषणा करू द्यायची नाही आणि दुसरीकडे फौजदारीची भाषा करायची, हे योग्य नाही. आम्ही काय चोर, दरोडेखोर आहोत का? खुमखुमी असेल तर एकदा फौजदारी कराच, असे प्रतिआव्हान बिद्री साखर कारखान्याचे अध्यक्ष व माजी आमदार के. पी. पाटील यांनी बैठकीत दिले.
जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या अडचणींबाबत शासकीय विश्रामगृह येथे जिल्हाधिकाऱ्यांनी बोलावलेल्या बैठकीत ते बोलत होते. कारखान्यांसमोरील अडचणी सांगा, शासनाला कळवू, असे प्रादेशिक उपसंचालक डी. टी. भापकर यांनी सांगितले. त्यांना रोखत पी. जी. मेढे म्हणाले, गेल्या पाच-सहा वर्षांत एफ. आर. पी.मध्ये ४६५ रुपयांची वाढ झाली. साखरेचे दर कितीने वाढले? राज्य बॅँकेच्या उचलीतून ऊसबिलासाठी १३१० रुपये हातात राहतात. शेतकऱ्यांना पैसे द्यायचे कसे? आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही २२५० रुपयांच्या पुढे साखर जाईना. गेल्या वर्षाची ८० लाख टन साखर शिल्लक असल्याने मार्केट पुढे सरकेना. अशा परिस्थितीत शासन म्हणून काही पावले उचलणार आहात का? गेल्या वर्षीचे निर्यात अनुदानाचे पैसे दिलेले नाही. खरेदी करमाफीचा निर्णय झाला असताना नोटिसा कशा? अशी विचारणा मेढे यांनी केली.
शासन गांभीर्याने घेणार नसेल तर जिल्हाधिकाऱ्यांच्या दारातच उसाचा ट्रक आणून ओतू, असा इशारा के. पी. पाटील यांनी दिला. जो उठतो तो आमच्यावर गुन्हे दाखल करण्यास निघालाय. हा पोरखेळ आहे काय? एफ. आर. पी. व साखरेचे दर तुम्हीच ठरवता; मग आमचा दोष काय? शेतकऱ्यांच्या कारखान्यांना कुलपे घालण्यास निघालात. तुमच्या कार्यालयाला कुलपे घालतो. संपूर्ण साखर कारखानदारी अडचणीत असताना मुख्यमंत्री व सहकारमंत्री मदतीचा शब्द पाळेनात. उलट फौजदारीची भाषा करीत आहेत. एकदा फौजदारी कराच, आम्ही कारखाने बंद करतो, अशा शब्दांत त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. पुणे, सोलापूरमधील कारखान्यांनी किती पैसे दिले? केवळ कोल्हापूरला लक्ष्य करून कारखानदारी बुडवायची का? माफ केलेला खरेदी कर वसूल करणार असाल तर जिल्हाधिकाऱ्यांच्या दारात ऊस आणून ओतू. कारवाईची खुमखुमी असेल तर एकदा फौजदारी कराच, असे आव्हान पाटील यांनी दिले. माजी आमदार सा. रे. पाटील, ‘गुरुदत्त शुगर्स’चे माधवराव घाटगे, ‘भोगावती’चे अध्यक्ष धैर्यशील पाटील, विजय औताडे, आर. बी. वाघ, डी. बी. पाटील, आर. पी. बारडे उपस्थित होते. (प्रतिनिधी)


सहसंचालक, जिल्हाधिकारी अनुपस्थित
जिल्हाधिकाऱ्यांनी बोलावलेल्या बैठकीला त्यांच्यासह साखर सहसंचालकही गैरहजर राहिले. जिल्हाधिकाऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून एकही महसूलचा अधिकारी उपस्थित नसल्याने कारखाना प्रतिनिधींनी नाराजी व्यक्त केली.
राजकीय अड्डे बंद करा
साखर कारखानदारीला उद्योग म्हणून स्वीकारा, साखरेचे दर बांधून द्या, अशी मागणी करीत कारखान्यावरील राजकीय अड्डे बंद केले नाहीत तर शेतकरी देशोधडीला लागतील, असा सल्लाही पी. जी. मेढे यांनी दिला.
कोंडून घालणाऱ्यांमुळेच वाटोळे
कारखानदारी वाचविण्यासाठी आम्ही टाहो फोडत असताना तुम्ही लक्ष देईना. कोंडून घालणाऱ्यांचे मात्र वाटेल ते ऐकता. त्यांच्यामुळेच कारखानदारीचे वाटोळे झाल्याची टीका के. पी. पाटील यांनी शेतकरी संघटनेचे नाव न घेता केली.