शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
2
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
3
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
4
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
5
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
6
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
7
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
8
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
9
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
10
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
11
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
12
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
13
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
14
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
15
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
16
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
17
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
18
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
19
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
20
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजी पोलिसांना मिळणार नऊ अत्याधुनिक दुचाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:25 IST

: शहरात १२८ ठिकाणी क्यूआर कोड प्रणाली़, घटनास्थळी अवघ्या काही वेळातच पोहोचणार पोलीस अतुल आंबी लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी ...

: शहरात १२८ ठिकाणी क्यूआर कोड प्रणाली़, घटनास्थळी अवघ्या काही वेळातच पोहोचणार पोलीस

अतुल आंबी

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : शहरातील दिवसेंदिवस वाढत जाणारी गुन्हेगारी रोखण्यासाठी आता पोलिसांची २४ तास गस्त वाढणार आहे. त्यासाठी इचलकरंजी पोलीस दलाला ई-बीट मार्शल सिस्टीमअंतर्गत ९ अत्याधुनिक दुचाकी मिळणार आहेत. त्यांच्या माध्यमातून शहरातील १२८ ठिकाणी लावलेले क्यूआर कोड स्कॅन करीत गस्त घातली जाणार आहे. त्यामुळे घटनास्थळावर अवघ्या काही मिनिटांतच पोलीस पोहोचणार आहेत.

वस्त्रनगरीत देशभरातील अनेक राज्यांमधून नागरिक कामानिमित्त येऊन राहिले आहेत. औद्योगिकीकरणामुळे उद्योगधंदे, कामगार संख्या वाढली, त्यापाठोपाठ गुन्हेगारीही फोफावली. त्यावर जरब बसविण्यासाठी आता पुण्यात राबविण्यात आलेली ई-बीट मार्शल सिस्टीम कोल्हापूर व इचलकरंजी शहरात राबविली जाणार आहे.

त्याअंतर्गत इचलकरंजीसाठी ९ अत्याधुनिक दुचाकी मिळणार आहेत.

या गाड्यांना सायरन वाजवणे, सूचना देणे (पुकारणे), फ्लॅश लाईट अशा आधुनिक सुविधा आहेत. त्यासाठी १८ दिवस व १८ रात्री असे ३६ पोलीस नियुक्त केले जातील. त्यांच्या माध्यमातून २४ तास संपूर्ण शहरात गस्त सुरू राहणार आहे.

गस्त सुरू असल्याची माहिती प्रत्येकवेळी पोलीस उपअधीक्षकांना मिळण्यासाठी शहरातील १२८ ठिकाणे निवडण्यात आली असून, त्या ठिकाणांवर क्यूआर कोड बसविण्यात आला आहे. प्रत्येक बीट मार्शलने नेमून दिलेल्या ठिकाणांवर जाऊन तो कोड स्कॅन करावयाचा आहे. तेथून कोणती दुचाकी कोठे आहे, यासंदर्भातील माहिती उपअधीक्षकांना मिळत राहणार आहे. यामुळे एखादी घटना घडल्यास संबंधित बिट मार्शलला माहिती दिल्यानंतर काही मिनिटांतच ते घटनास्थळी पोहोचतील. या आधुनिक व्यवस्थेमुळे शहरातील गुन्हेगारीवर वचक बसविणे. त्याचबरोबर चेन स्नॅचिंग, वाटमारी, मारामारी अशा घटनांमध्ये तत्काळ हालचाली (अ‍ॅक्शन) मुळे फरक पडणार आहे.

चौकटी

क्यूआर कोडची विभागणी

शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ६०, गावभाग पोलीस ठाणे ३६, तर शहापूर पोलीस ठाणे ३२ अशा १२८ ठिकाणी क्यूआर कोड बसविण्यात येणार आहे.

चारचाकी वाहनांची मागणी

इचलकरंजी शहरासाठी किमान ९ चारचाकी वाहने आवश्यक आहेत. सध्या तीनच उपलब्ध असून, तीही वारंवार बिघडतात. याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडे मागणी करण्यात आली आहे.