शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

Ichalkaranji Municipal Election Results 2026: इचलकरंजीत ४३ जागा जिंकत भाजपची एकहाती सत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 12:41 IST

विरोधी शिव-शाहू आघाडीचीही कडवी झुंज : शिंदेसेनेला ३, तर राष्ट्रवादी (अजित पवार)ला एक जागा

इचलकरंजी : महाराष्ट्राच्या मँचेस्टरची पहिल्या महापालिकेची निवडणूक ४३ जागा जिंकत भाजपने एकतर्फी जिंकली. केंद्रात, राज्यात आम्हीच, त्यामुळे शहराच्या विधायक विकासाचे आम्हीच मानकरी ठरू शकतो, यासाठी आम्हाला साथ द्या, या प्रचाराला इचलकरंजीच्या मतदारांनी प्रतिसाद देत भाजपला भरभरून मतदान केले. विरोधी शिव-शाहू आघाडीला १७ जागांवर समाधान मानावे लागले.

सुरुवातीपासूनच महायुतीतील प्रमुख पक्ष असलेल्या भाजपने विजयी घोडदौड कायम ठेवली. शेवटपर्यंत ही घोडदौड एकहाती सत्तास्थापन करण्यापर्यंत पोहोचली. सोबतीला घटक पक्ष म्हणून असणाऱ्या शिंदेसेनेला ३, तर राष्ट्रवादी (अजित पवार)ला एका जागेवर समाधान मानावे लागले. परंतु, सर्वाधिक उमेदवार देण्यापासून आग्रही असलेला भाजप उमेदवार विजयातही आघाडीवर राहिला, हे या निकालाचे वैशिष्ट्य ठरले.

महायुतीचे नेतृत्व करणारे माजी मंत्री प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर, आमदार राहुल आवाडे, रवींद्र माने, अशोक जांभळे यांनी सुरुवातीपासून प्रचारात आक्रमक भूमिका घेतली, तर विरोधी शिव-शाहू विकास आघाडीकडून आमदार सतेज पाटील यांनी विरोधकांना आव्हान दिले होते. माजी आमदार राजूबाबा आवळे, राजीव आवळे, शशांक बावचकर, सागर चाळके, संजय कांबळे, राहुल खंजिरे, प्रकाश मोरबाळे यांनी नियोजनबद्ध प्रचार यंत्रणेत कसलीही कसूर ठेवली नाही. त्यामुळे महायुतीच्या बलाढ्य शक्तीपुढे आव्हान निर्माण झाले होते. 

सुरुवातीला सर्व ठिकाणी आघाडी उमेदवार उभे करू शकत नाहीत, त्यांच्याकडे एवढी क्षमता नाही, अशी हवा महायुतीने केली होती; पण ती फोल ठरवत आघाडीने तगडे उमेदवार दिले. अनेक मातब्बरांचा या आघाडीमुळे धक्कादायक पराभव झाला. विशेष म्हणजे आघाडीतील अभ्यासू सतत सक्रिय असणारे नेते यांना पराभवाला सामोरे जावे लागले.

पक्षीय बलाबल

  • एकूण प्रभाग - १६
  • एकूण सदस्य - ६५
  • भाजप - ४३
  • शिंदेसेना - ३
  • राष्ट्रवादी (अजित पवार) - १
  • उद्धवसेना - १
  • शिव-शाहू आघाडी (कॉंग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार, मनसे, माकप) - १७
English
हिंदी सारांश
Web Title : BJP Secures Absolute Majority in Ichalkaranji Municipal Election 2026

Web Summary : BJP won the Ichalkaranji municipal election with 43 seats. The Shiv-Shahu alliance secured 17. BJP's development promises resonated with voters, leading to their victory. Mahayuti leaders led aggressive campaigns. The alliance presented formidable candidates, resulting in unexpected defeats for some.
टॅग्स :Ichalkaranji Municipal Corporation Electionइचलकरंजी महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६kolhapurकोल्हापूरMunicipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६BJPभाजपा