इचलकरंजी संक्षिप्त बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:17 IST2021-07-10T04:17:44+5:302021-07-10T04:17:44+5:30

इचलकरंजी : तिळवणी (ता. हातकणंगले) येथील रोटरी डेफ स्कूलचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी रोटरी क्लब इचलकरंजीचे अध्यक्ष ...

Ichalkaranji Brief News | इचलकरंजी संक्षिप्त बातम्या

इचलकरंजी संक्षिप्त बातम्या

इचलकरंजी : तिळवणी (ता. हातकणंगले) येथील रोटरी डेफ स्कूलचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी रोटरी क्लब इचलकरंजीचे अध्यक्ष प्रकाश रावळ होते. मुख्याध्यापिका स्मिता रणदिवे यांनी स्वागत केले. या वेळी नेमिनाथ कोथळे, रवींद्र नाकील, डी. एम. कस्तुरे, विश्वराध्य होनमुर्गीकर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन अमृता पाटील यांनी केले. भरत पवार यांनी आभार मानले.

लक्ष्मीकांत भट्टड यांची निवड

इचलकरंजी : येथील लायन्स क्लबच्या अध्यक्षपदी लक्ष्मीकांत भट्टड यांची निवड करण्यात आली. तसेच सचिवपदी शैलेंद्र जैन, तर खजिनदारपदी महेंद्र बालर यांची निवड झाली. अध्यक्षस्थानी महेश सारडा होते. अ‍ॅडमिनिस्ट्रेटर म्हणून विजयकुमार राठी हे काम पाहणार आहेत. या वेळी विजय जाजू, भरत भंडारी, लिंगराज कित्तुरे, मनोज सोमाणी आदी उपस्थित होते.

फोटो ओळी

०९०७२०२१-आयसीएच-०३-लक्ष्मीकांत भट्टड

Web Title: Ichalkaranji Brief News