शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीच्या डोक्यात दगड घालून पतीची आत्महत्या

By admin | Updated: November 2, 2016 01:23 IST

पत्नी गंभीर : वडणगेतील घटना

  वडणगे : वडणगे (ता. करवीर) येथे एका मजुराने पत्नीच्या डोक्यात दगड घालून स्वत: राहत्या घरी गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. विठ्ठल धावडू चव्हाण (वय ४२, सध्या रा. इंदिरानगर, वडणगे, मूळ गाव अरुर, ता. इंडी, जि. विजापूर) असे त्याचे नाव आहे. यामध्ये त्याची पत्नी सुशीला विठ्ठल चव्हाण (३७) गंभीर जखमी झालेली आहे. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. घटनेचा पंचनामा करवीर पोलिसांनी केला. समजलेली माहिती अशी, येथील पंडित ऊर्फ पोपट जाधव यांच्याकडे विठ्ठल चव्हाण ट्रॅक्टर-ट्रॉलीवर मजूर म्हणून काम करत होता. वडणगे-निगवे रस्त्यावर बांधलेल्या खोल्यांमध्ये चव्हाण पती-पत्नी राहत होते. चव्हाण यांना दारूचे व्यसन होते. गेल्या काही दिवसांपासून पती-पत्नीमध्ये सतत वाद होत होता. मंगळवारी सकाळी भाऊबिजेसाठी सुशीलाचा भाऊ आला होता. दरवाजा ढकलल्याबरोबर त्यांना बहीण रक्ताच्या थारोळ्यात विव्हळत पडलेली आणि विठ्ठल याने गळफास लावून घेतल्याचे दिसले. त्यांनी तत्काळ पंडित ऊर्फ पोपट जाधव यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. पोलिसपाटील शिवाजी सुतार यांना कळविले. शिवाजी सुतार यांनी करवीर पोलिसांत फिर्याद दिली. पोलिसांनी पंचनामा केला. जखमी अवस्थेतील सुशीला यांना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. विठ्ठल यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कोल्हापूर येथील सीपीआरमध्ये नेण्यात आला. सुशीला चव्हाण यांना अरूरला नेले वडणगे (ता. करवीर) येथे पतीच्या हल्ल्यात जखमी झालेल्या सुशीला विठ्ठल चव्हाण यांना पुढील उपचारासाठी सीपीआर रुग्णालयातून अरूर (ता. इंडी, जि. विजापूर) या ठिकाणी त्यांचा भाऊ शेडजी उमलू राठोड (सध्या राहणार आंबेडकरनगर, नागाव, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) यांनी मंगळवारी सायंकाळी नेले. याबाबतची माहिती करवीर पोलिस निरीक्षक दिलीप जाधव यांनी पत्रकारांना दिली.