शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
2
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
3
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
4
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
5
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
6
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
7
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
8
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
9
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
10
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
11
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
12
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
13
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
14
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
15
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
16
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
17
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
18
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
19
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
20
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
Daily Top 2Weekly Top 5

ज्योतिर्लिंग मंदिर केळोशी खुर्द देवराई संगोपनासाठी सरसावले शेकडो हात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 16:27 IST

श्रीकांत ऱ्हायकर धामोड- मंदीर परिसरामध्ये विविध प्रकारच्या फळ व फुलझाडांबरोबर औषधी वनस्पतींची लागवड करून मंदीर परिसर सुशोभित करण्याची संकल्पना ...

ठळक मुद्देगतसाली लावलेल्या ५०० झाडांचे संगोपन यावर्षीच्या नविन लागवडीसह झाडांचा वाढदिवस अनोख्या पध्दतीने साजरा

श्रीकांत ऱ्हायकरधामोड- मंदीर परिसरामध्ये विविध प्रकारच्या फळ व फुलझाडांबरोबर औषधी वनस्पतींची लागवड करून मंदीर परिसर सुशोभित करण्याची संकल्पना अगदी प्राचिन काळापासून रूढ असल्याचे दिसून येते . कारण आजही कांही प्राचीन मंदीरांच्या आवारात अशा देवराई जिवंत असल्याचे चित्र पहावयास मिळते. पण केळोशी खुर्द येथील प्राचिन जोतिर्लिंग मंदीर आवारात असलेली जुनी देवराई नष्ट झाली आहे. या देवराईला उर्जीतावस्था देण्यासाठी आता शेकडो हात सरसावले असून गेल्या वर्षापासून कांही स्थानिक पर्यावरण प्रेमींनी एकत्र येऊन देवराई संवर्धनाला सुरवात केली आहे .केळोशी खुर्द ग्रामपंचायतीमधील जोतिबा वसाहत येथील मंदीर परिसरातील शेकडो वर्षापूर्वीची देवराई नामशेष झाल्याने मंदीर परिसर भकास दिसत होता . पण स्थानिक पर्यावरणप्रेमी व कागल , करवीर येथील काही पर्यावरण प्रेमी व सामाजिक संघटनांनी पुढाकार घेऊन गेल्या वर्षी या देवराईतील जुनी झाडे काढुन या ठिकाणी नवीन विविध फळ , फुल व औषधी वनस्पतींची लागवड केली . जवळपास पाचशे झाडांचे संगोपन करून ती सर्वच जगवली .विशेष बाब म्हणजे सर्वच्या सर्व पाचशे झाडे जगवली . त्यासाठी ठिबक , खते , भांगलन , खुरपणी व पाण्याचे नियोजन व आर्थिक बाबीची पूर्तता स्थानिक पर्यावरण प्रेमींनी केली . एक विशेष बाब म्हणजे कोणतीही रासायनिक खते न वापरता फक्त शेंद्रिय खतेच वापरून या झाडांची निगा राखली आहे .नविन साकारत असलेल्या या देवराईला काल एक वर्ष पूर्ण झाले . त्यानिमित्त देवराईतील झाडांचा अनोखा वाढदिवस साजरा करण्यात आला .झाडे लावणेसाठी व मशागत करण्यासाठी आलेले निसर्गप्रेमींचे स्वागत केळोशीचे सरपंच रंगराव पाटील व उपसरपंच निवास पाटील व प्रकाश पाटील यांनी केले . यावेळी राजू पाटील येळवडेकर ,लाड सर राशिवडे ,आबा मांगोरे अकनूर ,राजू पाटील , मारूती मोळे, श्रीकांत ऱ्हायकर,नितीन शेटे, अरूण बहिरशेट, बापू तामकर , डॉ.पी आर कुंभार, संजय मांगोरे सायकलपटू ,अशोक पाटील मिस्त्री ,प्रकाश पाटील मिस्त्री ,अजित पाटील, दादू पाटील, तुकाराम कांबळे, दिव्य ज्योती मित्र मंडळ कागल बेनिक्रेचे रमेश पाटील, धोंडीराम देवडकर, शंकर गुरव इत्यादी निसर्गप्रेमी उपस्थित होते . ग्रामसेवक यशपाल पावरा यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली केळोशी खुर्द ( ता. राधानगरी ) येथील देवराईत झाडांची लागवड करून अनोख्या पध्दतीने वाढदिवस साजरा करताना पर्यावणप्रेमी

टॅग्स :environmentपर्यावरणkolhapurकोल्हापूर