शेकडो एकरातील पिके कुजणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:26 IST2021-07-27T04:26:56+5:302021-07-27T04:26:56+5:30

वेदगंगा नदीला या शतकातील उच्चांकी महापूर येऊन गेला. या पावसाने आणि महापुरात अनेक गावांत २४ घरे पूर्णतः पडली असून ...

Hundreds of acres of crops will rot | शेकडो एकरातील पिके कुजणार

शेकडो एकरातील पिके कुजणार

वेदगंगा नदीला या शतकातील उच्चांकी महापूर येऊन गेला. या पावसाने आणि महापुरात अनेक गावांत २४ घरे पूर्णतः पडली असून ३९ लाख ३० हजार, १५३ घरे अंशतः पडून ४२ लाख ३१ हजार ९००रुपये,३१ जनावरांच्या गोठ्याची पडझड होऊन २० लाख ८० हजार रुपये असे एकूण १ कोटी २ लाख ३६ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.तसेच डोंगरलगतच्या जमिनी खचून शेतकरी पुरता उद‌्ध्वस्त झालेला आहे.

कोळवण,म्हसवे,फये,डेळे पैकी भारमलवाडी येथे डोंगर खचले आहेत. भुदरगड किल्ल्यावर जाणाऱ्या रस्त्याला आणि फये येथील रस्त्याला मोठ्या भेगा पडल्याने वाहतुकीसाठी बंद केला आहे. तर पाल,टिक्केवाडी येथील भुजाई मंदिररस्ता,पडखंबे खोतवाडी या रस्त्यावर दरडी कोसळल्या आहेत. करिवडे हणफोडीवाडी रस्त्यावरील पूल वाहून गेला आहे. कडगाव शिसेवाडी रस्ता तुटून गेला आहे. नांदोली देऊळवाडी पुलाजवळ रस्त्याच्या साईडपट्टी वाहून गेली आहे. कडगाव ममदापूर रस्त्यावर गावठाण हद्दीतील संरक्षक भिंत तुटून गेली आहे.

Web Title: Hundreds of acres of crops will rot