शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

भयानक...पोकलॅनच्या बकेटचा दात मानेत घुसून कचरा वेचणाऱ्या महिलेचे शिर झाले धडावेगळे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2021 15:47 IST

Kolhapur News : कसबा बाड्यात झुम कचरा प्रकल्पावरील घटना : कचऱ्यातील शिर तीन तासांनी सापडले

ठळक मुद्देमंगल राजेंद्र दावणे (वय ६० रा. तिरंगा चौक, आठ नंबर शाळेनजीक, शिवाजी पेठ, कोल्हापूर) असे त्या ठार झालेल्या दुर्दैवी महिलेचे नाव आहे.

कोल्हापूर : कचऱ्याचे विलगीकरण करताना पोकलॅनच्या बकेटचा दात मानेत घुसून स्क्रॅप शोधणाऱ्या महिलेचे शिर धडावेगळे झाल्याची दुदैवी घटना रविवारी सकाळी कसबा बावडा येथील झुम प्रकल्पावर घडली. या घटनेमुळे प्रकल्पावर खळबळ माजली. घटनास्थळी महिलेचे धड मिळाले, पण शिर तुटून बकेटमधून कचऱ्याबरोबर ढिगाऱ्यात गायब झाल्याने सुमारे तीन तासाच्या अथक शोधकामानंतर ते कचर्यातच सापडले. मंगल राजेंद्र दावणे (वय ६० रा. तिरंगा चौक, आठ नंबर शाळेनजीक, शिवाजी पेठ, कोल्हापूर) असे त्या ठार झालेल्या दुर्दैवी महिलेचे नाव आहे. पोलिसांनी पोकलॅनवरील दोघा चालकांना ताब्यात घेतले आहे.घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, कसबा बावडा येथील झुम कचरा प्रकल्पावर संपूर्ण शहरातील कचरा टाकला जातो. रविवारी सकाळी इतर महिला मोठ्या ढिगाऱ्यानजीक कचऱ्यात स्क्रॅप शोधत होत्या, त्याचवेळी डंपीग ग्राऊंडच्या ठिकाणी पोकल्यानद्वारे कचरा हालवताना कचऱ्याच्या ढिगांमागे खड्ड्यात मंगल दावणे ह्या स्क्रॅप शोधत होत्या. पोकलॅन चालकाला ढिगाऱ्यामागे काही न दिसल्याने त्याने नेहमीप्रमाणे कचरा उचलला, त्याचवेळी बकेटचे दात स्क्रॅप शोधणाऱ्या त्या महिलेच्या मानेत घुसून त्याचे शिर धडावेगळे झाले.

धड कचऱ्याच्या खड्ड्यात राहीले तर शिर कचऱ्यासह उचलून इतर ढिगाऱ्यात टाकले. काहीवेळाने हा प्रकार चालकाच्या लक्षात आला. यावेळी त्याला कचऱ्याच्या खड्यात महिलेचे फक्त धडच दिसले. त्यानंतर तीन तास कचऱ्यात शोधकाम केल्यानंतर गडप झालेले शिर सापडले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरWomenमहिला