शहरं
Join us  
Trending Stories
1
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
2
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
3
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
4
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
5
“प्रियंका चोप्रामुळे राघव चड्ढा यांचा भाजपात प्रवेश”; नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नीचा मोठा दावा
6
धक्कादायक! नाशिक, अमरावतीसारखा प्रकार कोल्हापुरात; तरुणींचे Video बनवून ब्लॅकमेल, तरुणाला अटक
7
Budh Pradosh 2026: कर्जमुक्ती आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी २९ एप्रिलला न चुकता करा 'बुध प्रदोष' व्रत
8
Top Marathi News LIVE Updates: १ मेपासून मराठीची मोहीम सुरूच राहणार; मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
9
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
10
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
11
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
12
गोलsss... पंतप्रधान नरेंद्र मोदी सिक्कीमच्या तरुणांसोबत खेळले फुटबॉल, PHOTOS ची रंगली चर्चा
13
वाढदिवसासाठी Reel तयार करण्याच्या नादात युवकाने भलताच उद्योग केला; शेवटी हातात पडल्या बेड्या
14
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
15
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
16
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
17
‘RTE’ प्रवेश! पसंतीच्या शाळेसाठी पालकांची कोंडी; ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ, तरीही संभ्रम कायम
18
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
19
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
20
हृदयद्रावक! IPL सामना पाहून घरी परतणाऱ्या २ भावांवर काळाचा घाला; 'हिट अँड रन'मध्ये मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

बहुजनवादी जाणीवेचा इतिहासशोध महत्त्वाचा

By admin | Updated: August 30, 2015 23:09 IST

जयंत पवार : ‘तर्काच्या खुंटीवरून निसटलेले रहस्य’ने प्रेक्षकांना खिळवून ठेवले

कोल्हापूर : महाराष्ट्रात बहुजनवादी जाणीवेचा इतिहास आणि ललित लेखनातून तो मांडण्याचा प्रयत्न केला. जागतिकीकरणाच्या सध्याच्या स्थितीत बहुजनवादी जाणीवेचा इतिहासशोध महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक जयंत पवार यांनी केले. शिवाजी विद्यापीठाच्या वि. स. खांडेकर भाषा भवनातील ‘कथासंधी’ कार्यक्रमात ते बोलत होते. साहित्य अकादमी आणि विद्यापीठाचा विद्यार्थी कल्याण विभाग व विदेशी भाषा विभागातर्फे आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी विभागाचे प्रा. डॉ. रणधीर शिंदे होते.ज्येष्ठ साहित्यिक पवार म्हणाले, पहिला नाटक लिहिण्यास सुरुवात केली. यावेळी लेखन करताना केवळ व्यक्तिवाद, केवळ समग्रवादी तत्त्व आवश्यक असून तरच, बहुजनांबद्दल लिहिता येते हे लक्षात आले. हे तत्त्व बाळगून लेखन सुरू केले. मुंबईसारख्या महानगरांतील जडणघडण आणि जागतिकीकरणाच्या काळातील उपेक्षित माणसांच्या विश्वाने मला सतत लेखननिर्मितीसाठी विषय पुरविले. जागतिकीकरणामुळे पूर्वसमाजात तुटलेपण आले आहे. त्यात बहुजन समाजाची उपेक्षा होत आहे. ती समजून घेण्याची गरज आहे.कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. राजन गवस यांनी साहित्य अकादमीची भूमिका स्पष्ट केली. प्रा. डॉ. रणधीर शिंदे यांनी अध्यक्षीय भाषणात ज्येष्ठ साहित्यिक पवार यांच्या लेखनाचे विवेचन केले.यावेळी ज्येष्ठ राजकीय विश्लेषक डॉ. अशोक चौसाळकर, प्रा. शरद नावरे आदींसह विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होत्या. विदेशी भाषा विभागप्रमुख डॉ. मेघा पानसरे यांनी प्रास्ताविक केले. रुपाली कांबळे यांनी आभार मानले. दरम्यान, ज्येष्ठ साहित्यिक पवारलिखित ‘तर्काच्या खुंटीवरून निसटलेलं रहस्य’ या कथेचे अभिवाचन अतुल पेठे यांनी सादर केले. तसेच ज्येष्ठ साहित्यिक पवार यांनी ‘अधांतर’, ‘माझं घर’, ‘काय डेंजर वारा सुटलाय’ या नाटकांच्या निर्मितीबाबत उपस्थितांशी संवाद साधला. (प्रतिनिधी)