शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
3
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
6
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
7
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
8
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
9
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
10
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
11
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
12
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
13
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
14
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
15
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
16
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
17
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
18
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
19
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
20
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट

कल्याणमधील वृत्तपत्र विक्रेत्या आजीबाईंना मानव सहाय्य सेवा मंडळाकडून मदतीचा हात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2021 6:35 PM

गेल्या ७० वर्षापासून कल्याणमध्ये श्रीमती उषा पांडूरंग केतकर या ९६ वर्षाच्या आजीबाई वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांचे या वयातील कष्ट पाहून मानव सहाय्यक सेवा मंडळाच्या वतीने त्यांना जीवन गौरव सन्मान प्रदान करण्यात आला.

कल्याण - गेल्या ७० वर्षापासून कल्याणमध्ये श्रीमती उषा पांडूरंग केतकर या ९६ वर्षाच्या आजीबाई वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांचे या वयातील कष्ट पाहून मानव सहाय्यक सेवा मंडळाच्या वतीने त्यांना जीवन गौरव सन्मान प्रदान करण्यात आला. यावेळी त्यांना मान्यवरांच्या हस्ते २१ हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. काल मकरसंक्रातीच्या दिवशी झालेला सन्मान आणि मिळालेली मदत हे आजीबाईंच्या चेह:यावर हास्य फुलविणारे ठरले.केतकर आजी या महिला सक्षमीकरण आणि स्वावलंबनाच्या उत्तम उदाहरण आहेत. २१ हजाराचा धनादेश शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते टिळक चौकात केतकर यांना सन्मापूर्वक प्रदान करण्यात आला. या प्रसंगी माजी महापौर वैजयंती घोलप, सभागृह नेते प्रकाश पेणकर, समाजसेवक प्रकाश मुथा, पत्रकार तुषार राजे, ठाणो पत्रकार विक्रेता संघाचे प्रमुख दत्ता तेली, दिनेश सोमाणी आदी मान्यवर उपस्थित होते. मानव सहाय्यक सेवा मंडळाचे अध्यक्ष शंकर आव्हा, सचिव अम्मार काझी, गिरीश लटके, कोषाध्यक्ष संजय वाजपाई, प्रा. महेंद्र भावसार, राजू गवळी, दामू काबरा, रमेश करमरकर, प्रशांत म्हात्रे आदीनी या साठी परिश्रम घेतले. 

टॅग्स :kalyanकल्याण