‘गोकुळ’ प्रशासक नियुक्तीवर उद्या सुनावणी, न्यायालयाच्या निकालाकडे कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 16:06 IST2026-05-18T16:06:11+5:302026-05-18T16:06:34+5:30

कोल्हापूर : ‘ गोकुळ’ दूध संघाच्या संचालकांना कल्पना न देता कायद्याचा आधार घेऊन करण्यात आलेल्या प्रशासकीय मंडळाच्या नियुक्तीला स्थगिती ...

Hearing on appointment of gokul dudh sangh administrator tomorrow, Kolhapur district's attention on court verdict | ‘गोकुळ’ प्रशासक नियुक्तीवर उद्या सुनावणी, न्यायालयाच्या निकालाकडे कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष 

‘गोकुळ’ प्रशासक नियुक्तीवर उद्या सुनावणी, न्यायालयाच्या निकालाकडे कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष 

कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघाच्या संचालकांना कल्पना न देता कायद्याचा आधार घेऊन करण्यात आलेल्या प्रशासकीय मंडळाच्या नियुक्तीला स्थगिती द्यावी, या माजी संचालकांच्या याचिकेवर उद्या, मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाच्याकोल्हापूर सर्किट बेंचमध्ये सुनावणी होणार आहे. न्यायालयाने याबाबत सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले होते, त्यामुळे न्यायालय याबाबत काय निकाल देते ? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

गोकुळ’च्या संचालकांची ३ मे रोजी मुदत संपल्यानंतर राज्य शासनाने तातडीने प्रशासकीय मंडळ आणले. त्याला राष्ट्रवादी काँग्रेस, शिंदेसेना, जनसुराज्य पक्षाच्या माजी संचालकांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. पण, उच्च न्यायालयात दाद मागण्याचा सल्ला सर्वोच्च न्यायालयाने दिला होता.

त्यानुसार माजी संचालकांसह पुगाव (ता. राधानगरी) येथील स्वामी समर्थ सहकारी दूध संस्थेच्या वतीने काेल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल केली. त्यावर मंगळवारी (दि. १२) सुनावणी होऊन याबाबत, सोमवारपर्यंत म्हणणे सादर करण्याची सूचना राज्य सरकारला दिली. त्यामुळे उद्याच्या सुनावणीमध्ये न्यायालय काय निकाल देते ? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Web Title : गोकुल प्रशासक नियुक्ति पर कल सुनवाई; कोल्हापुर जिले की नजर न्यायालय के फैसले पर

Web Summary : बॉम्बे हाईकोर्ट गोकुल दुग्ध संघ में प्रशासक की नियुक्ति को चुनौती देने वाली याचिका पर सुनवाई करेगा। पूर्व निदेशकों ने नियुक्ति पर रोक लगाने की मांग की है। अदालत ने सरकार से हलफनामा दाखिल करने को कहा था। कोल्हापुर जिले को अदालत के फैसले का इंतजार है।

Web Title : Gokul Administrator Appointment Hearing Tomorrow; Kolhapur District Focuses on Court Verdict

Web Summary : The Bombay High Court will hear a petition challenging the appointment of an administrator to the Gokul Milk Union. Former directors seek a stay on the appointment. The court had asked the government to file an affidavit. Kolhapur district awaits the court's decision.