शहरं
Join us  
Trending Stories
1
Fuel Price Hike: मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; पाहा मुंबई, पुण्यातील आजचे वाढलेले दर...
2
"माझ्या शांततेला कमजोरी समजू नका, मी लवकरच परतणार!" शेख हसीना यांचा बांगलादेशला थेट इशारा
3
माणुसकी उरली नाही! भररस्त्यात जोडप्याला बांबूने बेदम मारहाण अन् आजूबाजूला बघ्यांची गर्दी, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
4
अमेरिकेची दादागिरी चालणार नाही; भारत रशियाकडून तेल खरेदी करणारच, सरकारचा स्पष्ट संदेश
5
२७ एप्रिललाच नीटचा लीक पेपर नाशिकमध्ये पोहोचला, मिळताच शुभम दोन दिवस नाशिकमधून बाहेर
6
San Diego Firing : 'माझा मुलगा...'; आईने पोलिसांना केला होता कॉल, १७ आणि १८ वर्षाच्या मुलांच्या हल्ल्याने मशीद हादरली
7
Video: ‘मी महाराष्ट्र सोडून जाऊ का?’ नाना पाटेकर भावुक
8
शिंदेसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजप करणार उमेदवारीसाठी दावा; विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले
9
Vladimir Putin to Visit China: ट्रम्प यांच्यानंतर पुतिन चीनला भेट देणार! शी जिनपिंग यांच्यासोबत 'या' मुद्द्यांवर होणार द्विपक्षीय चर्चा
10
Twisha Sharma : "दीदी, या मला २४ तास कंट्रोल करतात"; मृत्यूच्या अवघ्या १० मिनिटांपूर्वी ट्विशाने पाठवला होता मेसेज!
11
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२६, आर्थिक लाभाची संधी, वाणी वर संयम ठेवावा लागेल
12
१ जूनपासून महिलांच्या खात्यावर येणार ३ हजार ; प. बंगालच्या नव्या सरकारचा आश्वासनपूर्तीचा धडाका
13
अमेरिकेत मशिदीत अंधाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
14
मोटेगावकरने स्वतःच्या मुलासाठीच फाेडला पेपर? नऊ दिवसांची कोठडी, सीबीआयचा दावा; हस्तलिखित नोट्सच्या माध्यमातून पुरवले प्रश्न व उत्तरे
15
एक हजारावर विद्यार्थ्यांकडून पेपर खरेदी; ‘सीबीआय’ला संशय : नागपूरमधील ‘आलोक’ आता रडारवर
16
साखरपुड्याला जाण्यासाठी ट्रकमध्ये बसले ६० जण; कंटेनरची धडक, १३ ठार
17
सीबीआय पथक लातूर शहरात ठाण मांडून; कोचिंग क्लासेस परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात  
18
विधान परिषदेच्या १७ जागांसाठी रणसंग्राम; १८ जूनला निवडणूक होणार
19
वंदना सूर्यवंशी यांची विभागीय चौकशी प्रारंभ, मुंबई मुद्रांक जिल्हाधिकारी असताना ४९.३१ कोटींचे शासनाचे केले हाेते नुकसान
20
एक डॉलर ९६.३५ रुपयांना...! खिसा सांभाळून ठेवा, महागाई पाेहाेचणार उच्चांकावर
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाचे आमिष दाखवून एकीसोबत शारीरिक संबंध ठेवले, अन् दुसरीसोबतच केला विवाह

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2023 12:35 IST

फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर नैराश्यातून पीडित युवतीने केला आत्महत्येचा प्रयत्न

पेठवडगाव : लग्नाचे आमिष दाखवून युवतीशी शारीरिक संबंध ठेवत तिला जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी एका युवकाविरोधात रात्री उशिरा गुन्हा नोंद करण्यात आला. गेली अडीच वर्षे हा प्रकार सुरू होता. याप्रकरणी युवतीच्या फिर्यादीवरून रितेश प्रशांत पाटील (वय २२, रा. किणी) याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार किणी येथील रितेश पाटील याची पन्हाळा तालुक्यातील महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या युवतीबरोबर पाच वर्षांपूर्वी ओळख झाली होती. यातून त्याने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. तिला वाठार येथील एका हॉटेलमध्ये बोलावून लैंगिक अत्याचार केले. मात्र, त्यानंतर रितेश याने अन्य एका युवतीबरोबर विवाह केला. 

त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर नैराश्यातून पीडित युवतीने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, नातेवाइकांनी तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान शुक्रवारी युवतीने वडगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. तपास पोलिस उपाधीक्षक रामेश्वर वैंजणे, हवालदार पतंगराव रेणुसे करीत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस