शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

‘तावडे हॉटेल’वर उद्यापासून हातोडा

By admin | Updated: May 25, 2014 01:12 IST

प्रशासनाची तयारी : पोलीस बंदोबस्तासाठी दिले पत्र

कोल्हापूर : शहराच्या पूर्वभागात राष्टÑीय महामार्गाला लागून असलेल्या तावडे हॉटेल परिसरातील अनाधिकृत इमारतींवर सोमवारपासून कारवाई करण्याची महापालिका प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. महापालिकेला आज व उद्या सुटी असतानाही काही अधिकारी या कारवाईच्या अनुषंगाने कार्यरत आहेत. सोमवारच्या कारवाईसाठी पोलीस बंदोबस्त मिळावा म्हणून मनपा प्रशासनाने पोलीस अधीक्षकांना पत्र दिले आहे. शुक्रवारच्या स्थायी समिती सभेत तावडे परिसरातील अनाधिकृत बांधकामावर खडाजंगी चर्चा झाल्यानंतर प्रशासनातील अधिकारी खडबडून जागे झाले आहेत. शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, ताराराणी चौक विभागीय कार्यालयाचे उपअभियंता एम. एम. निर्मळे आणि त्यांचे सहकारी आज दिवसभर सोमवारपासून करायच्या कारवाईचे नियोजन करत होते. महानगरपालिकेची हद्द असतानाही उचगांव ग्रामपंचायतीची परवानगी घेऊन १०९ इमारती बांधण्यात आलेल्या आहेत. त्यातील काही जागा या ट्रक टर्मिनस व कचरा डेपोसाठी आरक्षित ठेवण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे आधी आरक्षित जागेवरील इमारती पाडण्यात येणार असून अशा इमारती किती आहेत याची यादी तयार केली जात आहे. त्यानंतर आरक्षण नसलेल्या जागांवरील इमारतींवर कारवाई केली जाणार आहे. परंतु ही कारवाई कोणत्या स्वरुपाची राहील हे न्यायालयाचे निर्देश, बीपीएमसी अ‍ॅक्टमधील तरतुदी याचा अभ्यास करूनच ठरविले जाणार आहे. आधी सर्व इमारत मालकांच्यावतीने उचगांव ग्रामपंचायतीने जागेच्या हद्दीबाबत न्यायालयात धाव घेतली होती, परंतु न्यायालयाने ग्रामपंचायतीची याचिका फेटाळली होती. त्यानंतर महापालिकेच्या कारवाईला हरकत घेत २३ इमारत मालकांनी वैयक्तिक याचिका दाखल केल्या आहेत. त्यातही ८ इमारतींवर कारवाई करण्यास न्यायालयाने मनाई केली आहे, १५ इमारत मालकांच्या याचिका फेटाळल्या आहेत. या १५ जणांना महापालिकेने कारवाईची नोटीस बजावली होती. नोटिसीची मुदत संपताच त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. काही इमारत मालकांचे सर्व्हे क्रमांक चुकले असल्याने त्यांना पुन्हा एकदा नोटीस काढण्याची प्रक्रिया महापालिकेने सुरू केली आहे. एकूण १०९ जागांपैकी ३३ जागांची गुंठेवारी प्रकरणे नियमीत करून देण्यात आली असल्याने त्यांच्यावर कारवाई होणार नाही. आरक्षण टाकण्यापूर्वी म्हणजे १९४६ पूर्वीपासून या जागेवर आठ घरे आहेत. त्यांनाही सवलत द्यावी लागण्याची शक्यता आहे. सोमवारपासून जर आरक्षित जागेवरील इमारती पाडून त्यांची जागा महापालिकेने ताब्यात घ्यायचे ठरविले तर जागेच्या मूळ मालकांना मोबदला कोणी व किती द्यायचा याबाबत मात्र संभ्रमावस्था आहे. (प्रतिनिधी)