वरदच्या खुन्यांना मरेपर्यंत फाशी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:27 IST2021-08-26T04:27:54+5:302021-08-26T04:27:54+5:30

निवेदनात जादूटोणा-नरबळी देऊन मुले होतात, असे सांगितलेल्या माणसाचा शोध घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करावा, या खटल्यासाठी ॲड. उज्ज्वल निकम ...

Hang the murderers of Varad to death | वरदच्या खुन्यांना मरेपर्यंत फाशी द्या

वरदच्या खुन्यांना मरेपर्यंत फाशी द्या

निवेदनात जादूटोणा-नरबळी देऊन मुले होतात, असे सांगितलेल्या माणसाचा शोध घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करावा, या खटल्यासाठी ॲड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी जिल्हा नेते सतीश माळगे, बी. के. कांबळे, भारत सोरटे, कुंडलिक कांबळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

--

दलितांवरील अन्याय थांबवावा

कोल्हापूर : राज्यात ठिकठिकाणी सुरू असलेल्या दलितांवरील अन्याय अत्याचार थांबवावा, अशी मागणी ब्लॅक पँथर पक्षाने केली आहे. याबाबतचे निवेदन बुधवारी जिल्हा प्रशासनाला दिले.

चंद्रपूर जिल्ह्यात भानामतीच्या संशयाने वयोवृद्ध स्त्री-पुरुषांना मारहाण करण्यात आली, सोलापूर जिल्ह्यात दलित व्यक्तीच्या मृत्यदेहावर अंत्यसंस्कार नाकारण्यात आले. ओडिसामधील पुरी जिल्ह्यात जातीयवाद्यांनी दलितांना गावाबाहेर काढले. देशात आजही मागासवर्गियांवर अन्याय, अत्याचाराचे प्रमाण कमी झालेले नाही, तरी या बाबींची गंभीर दखल घेऊन संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली. यावेळी संस्थापक अध्यक्ष सुभाष देसाई, जिल्हाध्यक्ष दयानंद कांबळे, विठ्ठल कांबळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

---

Web Title: Hang the murderers of Varad to death