शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

तावडे हॉटेल परिसरावर आठ दिवसांत हातोडा

By admin | Updated: May 21, 2014 17:38 IST

महापालिका सर्वसाधारण सभेत निर्णय : घरफाळ्यासाठी वाढीव दंड आकारणीस नकार

 कोल्हापूर : तावडे हॉटेल ते गांधीनगर रस्त्यावरील मिळकतींची जागा महापालिकेची असल्याचा निकाल न्यायालयाने दिला आहे. आता कारणे न सांगता प्रशासनाने अतिक्रमण हटविण्याची कारवाई करावी, अशी जोरदार मागणी आज (मंगळवार) झालेल्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी केली. यानंतर शहर अभियंता, विभागीय कार्यालय क्रमांक -४ व नगररचना विभागाने तातडीने कारवाई करून अहवाल द्यावा, असे आदेश आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी दिले. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर सुनीता राऊत होत्या. गेल्यावेळी तावडे हॉटेलप्रकरणी मात खाल्ल्यानंतर शिस्तबद्ध कागदपत्रे पुरविल्याने महापालिकेचा जागेवर हक्क अबाधित राहिला. आता विनाविलंब प्रशासनाने बांधकामे हटविण्यासाठी कारवाई करावी, पोलीस बंदोबस्ताचे कारण सांगून हात झटकू नयेत, अशी मागणी जयंत पाटील, निशिकांत मेथे, सचिन चव्हाण, शारंगधर देशमुख यांनी केली. महापालिकेचे वकील प्रशांत चिटणीस यांनी कारवाई करण्यात कोणतीही कायदेशीर अडचण नसल्याचे स्पष्ट केले. आयुक्तांनी तत्काळ कारवाईचे आदेश दिल्याने येत्या आठ दिवसांत प्रत्यक्ष अतिक्रमण हटविण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. रस्त्यावरील विजेच्या खांबाच्या दुरुस्तीचे खासगीकरण केल्याने कामे रखडली आहेत, अशी तक्रार यशोदा मोहिते, प्रक ाश नाईकनवरे, भूपाल शेटे यांनी केली. सदरचा ठेका रद्द करून महापालिकेतर्फे पूर्ववत दुरुस्तीचे काम करण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले. शौचालयासाठी नव्याने उभारलेले सौर दिवे बंद पडले आहेत. यातील ९० टक्के दिव्यांची बॅटरी चोरीला गेल्याची माहिती महेश कदम व भूपाल शेटे यांनी दिली. करारानुसार ठेकेदाराकडून दुरूस्त करून घ्या, असे आयुक्त बिदरी यांनी जलअभियंता मनिष पवार यांना सांगून चोरीप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्याची सूचना केली. कळंबा कारागृहाभोवती ५०० मीटर पुन:र्विकास प्रस्ताव फेटाळण्याची मागणी करीत मधुकर रामाणे यांनी यामुळे परिसरातील ५० कॉलनीतील २५ हजार कुटुंबांना अडचणी निर्माण होतील, असे सांगितले. ५०० की १५० मीटर याची शहानिशा करून हा प्रस्ताव पुनर्विचारासाठी राज्य शासनाकडे पाठविण्याचा महत्त्वाचा निर्णय सभेत घेण्यात आला. एचसीएल इन्फोसिस्टीम लिमिटेडने करारानुसार अंतर्गत सुविधेत बदल केलेले नाहीत, यामुळे कंपनीला नावात बदल करण्यास परवानगी न देण्याचा निर्णय सभेने घेतला. (प्रतिनिधी)