गुडाळ, कंथेवाडी, खिंडी व्हरवडे येथे आघाड्यांचे वर्चस्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:24 IST2021-01-20T04:24:09+5:302021-01-20T04:24:09+5:30
गुडाळ येथे अकरा जागेसाठी २२ उमेदवार रिंगणात उतरले होते. त्यामध्ये भोगावतीचे जेष्ठ संचालक ए. डी. पाटील (काँग्रेस ...

गुडाळ, कंथेवाडी, खिंडी व्हरवडे येथे आघाड्यांचे वर्चस्व
गुडाळ येथे अकरा जागेसाठी २२ उमेदवार रिंगणात उतरले होते. त्यामध्ये भोगावतीचे जेष्ठ संचालक ए. डी. पाटील (काँग्रेस ) माजी संचालक महादेवराव कोथळकर, राष्ट्रवादीचे वसंतराव पाटील (काँग्रेस) व भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जयसिंग हुजरे (राष्ट्रवादी) यांच्या महाआघाडीने अकरा पैकी दहा जागा जिंकून एकहाती सत्ता राखली.
कंथेवाडी ग्रामपंचायतीमध्ये सातपैकी चार जागा वसंतराव पाटील (जनता दल) व संजय भोपळे (काँग्रेस) आघाडीने मिळवून सत्ता काबीज केली तर तीन जागा (शेकापचे) एकनाथ पाटील व (राष्ट्रवादीचे) बाबूराव भोसले यांच्या आघाडीला मिळाल्या.
खिंडी व्हरवडे येथे रामचंद्र पाटील व ॲड. बी.जी. खांडेकर (काँग्रेस) व राजाराम पाटील, शिवाजी पारखे व चंद्रकांत तोरस्कर (राष्ट्रवादी) यांनी महाआघाडी केली होती, तर त्यांच्या विरोधात श्रीकांत पाटील यांनी दंड थोपटले होते; पण येथे सत्तारूढ महाआघाडीची सत्ता आली.
आणाजे येथे राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष दिनकर पाटील, डाॅ. सुभाष पाटील व संजय तिबीले (काँग्रेस) यांच्या सत्तारूढ ईवरादेवी माणकेश्वर ग्रामविकास आघाडीच्या विरोधात (शेकापचे) मोहन पाटील, (काँग्रेसचे) एल.टी. पाटील, भिवा पाटील व (राष्ट्रवादीचे) सर्जेराव पाटील यांनी ईवरादेवी ग्रामविकास आघाडी केली होती, त्यामध्ये विरोधी आघाडीने नऊपैकी सात जागा जिंकून एकहाती सत्तांतर केले.