शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
4
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
5
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
6
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
7
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
8
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
9
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
10
ATS ची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर्स, ISI साठी काम करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक
11
IPL 2026: MS Dhoni यंदा एकही सामना खेळू शकणार नाही? CSKच्या कोचने सांगितली सत्य परिस्थिती
12
पहिल्याच सीरिजमध्ये दिला किसींग सीन, काजोलने इतक्या वर्षात का मोडला तिचाच नियम? म्हणाली...
13
कडक उन्हाळ्यातही टिफिनमधील अन्नपदार्थ होणार नाहीत खराब, फक्त अशाप्रकारे करा पॅक
14
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
15
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
16
पत्र्याच्या शेड उडाल्या, झाडे कोसळली; सावंतवाडीत अवकाळी पावसाने उडवली दाणादाण, मोठ्या प्रमाणात नुकसान
17
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
18
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
19
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
20
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
Daily Top 2Weekly Top 5

विविध संस्थांतर्फे शिवाजी महाराजांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:11 IST

कोल्हापूर शहरातील विविध पक्ष, संस्था, संघटना यांच्या वतीने शिवजयंतीनिमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले. ...

कोल्हापूर शहरातील विविध पक्ष, संस्था, संघटना यांच्या वतीने शिवजयंतीनिमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले.

शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शहर कार्यालयात माजी नगरसेवक उत्तम कोराणे आणि ग्रंथालय सेलचे अध्यक्ष गणपतराव बागडी यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष आर. के. पोवार, सरचिटणीस सुनील देसाई, आदिल फरास, संभाजी देवणे, शारदा देवणे, महेंदर चव्हाण, जहिदा मुजावर, सुहास साळोखे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

श्री अंबाबाई भक्त मंडळातर्फे शिवजयंतीनिमित्त स्नेहल चव्हाण यांच्या हस्ते रोपांचे वाटप करण्यात आले, तर अंबाबाई अन्नछत्रामध्ये रावसाहेब इंगवले यांच्या हस्ते महाप्रसाद वाटप करण्यात आला. यावेळी अध्यक्ष संजय साळोखे, उपाध्यक्ष महेश्वरी सरनोबत, कविता कोंडेकर, योगेश इंगवले, शोभा पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

कोल्हापूर बौद्ध अवशेषमार्फत अध्यक्ष टी. एस. कांबळे, कार्याध्यक्ष बापूसाहेब कांबळे यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी सर्जेराव थोरात, विपुल वाडीकर, युवराज कांबळे, प्रवीण कांबळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. गंगावेश येथील राजर्षी शाहू जीवन विकास चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने अध्यक्ष किरण मांगुरे यांच्या अध्यक्षतेखाली युवा कार्यकर्ते ऋतुराज क्षीरसागर यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. ज्येष्ठ नागरिकांचा यावेळी सत्कार करण्यात आला. कार्याध्यक्ष बंडी रावळ यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली.