शहरं
Join us  
Trending Stories
1
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
2
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
3
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
4
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
5
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
6
'सैराट'फेम अभिनेता 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार, रितेशसोबत फोटो पोस्ट करत म्हणाला...
7
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
8
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
9
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
10
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
11
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
12
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
13
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
14
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
15
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
16
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
17
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
18
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
19
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
20
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

मदतीच्या प्रतीक्षेत द्राक्ष बागायतदार

By admin | Updated: December 4, 2014 23:34 IST

हवामानासंबंधी ठोस माहिती गरजेची

संदीप बावचे -जयसिंगपूर -अवकाळीच्या तडाख्याने नुकसान झालेल्या शिरोळ तालुक्यातील द्राक्ष बागायतदार शेतकरी नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत. पंचनाम्याचा अहवाल शासनाकडे पाठविला आहे. मार्च २०१४ मध्ये झालेल्या गारपिटीच्या तडाख्याने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या निकषांमुळे नुकसान भरपाई मिळाली नव्हती. यामुळे द्राक्ष बागातदारांना तरी नुकसान भरपाई मिळणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. अवकाळी आणि ढगाळ हवामानामुळे गणेशवाडी, निमशिरगाव, शेडशाळ, दानोळी, टाकळी, नांदणी, जैनापूर, आदी गावांतील द्राक्ष बागायतदार हवालदील झाले होते. सुमारे आठशे एकर द्राक्षबागा या परिसरात आहेत. बदलत्या हवामानामुळे द्राक्षकूज, मणीगळ, दावणी, आदी रोगांचा प्रादुर्भाव खास करून जाणवला होता. अवकाळी पावसामुळे व ढगाळ हवामानामुळे या पिकाला जणू ग्रहणच लागले. शेतकरी भयभीत झाला. सतत पावसाच्या होणाऱ्या माऱ्यामुळे द्राक्ष घड कुजण्याच्या, तर पाणी साठल्यामुळे द्राक्ष मणी गळण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. अस्मानी संकटानंतरही शेतकऱ्यांनी औषध फवारणी करून हे पीक वाचविण्याचा प्रयत्न केला. एकूणच उत्पादनाचा महागडा खर्च, औषध फवारणीत येणारा व्यत्यय, मजुरांचा तुटवडा व हवामानाच्या न येणाऱ्या अंदाजामुळे द्राक्ष बागयतदारांचे कंबरडे मोडल्याची स्थिती निर्माण झाली होती. दरम्यान, कायम स्वरूपी संरक्षण देऊन द्राक्ष पिकांना आधारभूत किंमत शासनाने ठरवावी, अशी मागणी द्राक्ष बागायतदारांतून होत आहे. हवामानासंबंधी ठोस माहिती गरजेचीअवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या द्राक्ष बागायतदारांना यापूर्वी हेक्टरी १२ हजार रुपये नुकसान भरपाई मिळत होती. द्राक्ष पिकासाठी येणारा औषधांचा खर्च पाहता शासनाकडून मिळणारी ही मदत तुटपुंजीच ठरणार आहे. वास्तविक भूगोल शास्त्रानुसार ग्लोबल वार्मिंगचे काम करणाऱ्या यंत्रणेकडून वातावरणातील हवामानाची ठोस माहिती उपलब्ध होणे गरजेचे आहे. तरच द्राक्ष बागायतदारांना पिकांचे नियोजन करणे सोयीचे ठरणार आहे.