शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
4
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
5
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
6
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
7
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
8
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
9
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
10
ATS ची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर्स, ISI साठी काम करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक
11
IPL 2026: MS Dhoni यंदा एकही सामना खेळू शकणार नाही? CSKच्या कोचने सांगितली सत्य परिस्थिती
12
पहिल्याच सीरिजमध्ये दिला किसींग सीन, काजोलने इतक्या वर्षात का मोडला तिचाच नियम? म्हणाली...
13
कडक उन्हाळ्यातही टिफिनमधील अन्नपदार्थ होणार नाहीत खराब, फक्त अशाप्रकारे करा पॅक
14
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
15
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
16
पत्र्याच्या शेड उडाल्या, झाडे कोसळली; सावंतवाडीत अवकाळी पावसाने उडवली दाणादाण, मोठ्या प्रमाणात नुकसान
17
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
18
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
19
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
20
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात घुमतोय ‘दादा’ आवाज

By admin | Updated: October 12, 2014 23:32 IST

विधानसभा निवडणूक : विजय कडणेंच्याच आवाजावर अनेक उमेदवारांच्या प्रचाराची भिस्त

अविनाश कोळी - सांगली --ऐकणाऱ्या प्रत्येकाच्या हृदयाला साद घालणारा एक भारदस्त आवाज... गेल्या ३५ वर्षांहून अधिक काळ सांगलीच्या राजकारणाला वेड लावलेला... सत्तरीच्या उंबरठ्यावर असूनही अद्याप तारुण्यात असलेल्या या आवाजाशिवाय राजकीय सभा, समारंभ आणि प्रचाराचे कार्यक्रम पुढे जाऊच शकत नाहीत... यंदाच्या विधानसभेलाही या आवाजाने इतकी जादू केली आहे की, लढती बहुरंगी असल्या तरी, प्रत्येकाच्या प्रचारात हा एकच आवाज घुमत आहे. लांबसडक कुर्ता... पायजमा... डोक्यावर गांधी टोपी आणि सोबतीला सायकल, अशा वेशभूषेतील विजयदादा कडणे यांच्या आवाजाचा महिमा आता सांगली जिल्ह्यासह राज्यभर पसरला आहे. नेता स्थानिक असो की राष्ट्रीय, समारंभ असो की प्रचार सभा, रिक्षातून प्रचार असो की लोकांसाठीची डॉक्युमेंटरी, प्रत्येक ठिकाणी दादांचा आवाज ठरलेला. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत दादांच्या या आवाजाने वेगळाच महिमा दाखवून दिला. प्रथमच विधानसभेच्या निवडणुकीत उमेदवारांची एवढी गर्दी दिसत आहे. गर्दीतल्या बहुतांश उमेदवारांनी दादांचाच आवाज प्रचारासाठी वापरला आहे. एकाच चौकात प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या रिक्षा प्रचार करीत थांबल्यानंतर सर्व बाजूंनी एकच आवाज घुमत असल्याचे दिसून येत आहे. कमळाचा, हाताचा, धनुष्यबाणाचा, घड्याळाचा, नारळाचा आणि बऱ्याच चिन्हांचा प्रचार एकटे दादाच करीत आहेत. दादांचे वय ६७ आहे. गेल्या ३५ ते ४0 वर्षांपासून निवेदक, कलाकार, दिग्दर्शक अशा अनेक भूमिकांमधून ते लोकांसमोर येत आहेत. तरीही संपूर्ण जिल्ह्याला आणि राज्यातील नेत्यांना कडणेदादा आवाजामुळे परिचित आहेत. लोकांना खिळवून ठेवणे, त्यांचे मनोरंजन करणे, वातावरण निर्मिती करणे आणि त्यांच्यावर आपल्या आवाजाच्या माध्यमातून छाप पाडण्याचे काम कडणेदादा गेली अनेक वर्षे अविरतपणे करीत आहेत. त्यांच्या आवाजाशिवाय राजकारण्यांचा प्रचार किंवा कार्यक्रम आळणी वाटतो. जिल्ह्याच्या राजकारणाचे, इथल्या परंपरेचे आणि कडणेदादांच्या आवाजाचे घट्ट नाते आहे.पाच-सहा तास स्टुडिओतकडणेदादांच्या आवाजाला निवडणूक, उत्सव काळात अधिक मागणी असते. निवडणुकीत पाच ते सहा तास ते स्टुडिओत होते. आवाजाबाबत सतर्कतागेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्या आवाजाची ढब, संवादातील चढ-उतार, त्यातील माधुर्य, जपलेले भाषासौंदर्य यात काहीही फरक पडलेला नाही. म्हणूनच दादांचे वय वाढले तरी, त्यांच्या आवाजाला चिरतारुण्याचे वरदान लाभल्याचे दिसून येते. हा आवाज तसाच रहावा, ऐन धामधुमीत तो खराब होऊ नये म्हणून कडणेदादा बाहेर खाण्याचे टाळतात.कसरत सभांचीभाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना किंवा अन्य पक्षांच्या कोणत्याही कार्यक्रमांना, प्रचार सभांना कडणेदादांनाच निमंत्रण दिले जाते. एकाचवेळी अनेक पक्षांची सभा असेल, तर त्यांची सायकलवरून सर्व कार्यक्रमांना आवाज देण्यासाठी कसरत सुरू असते. शिवसेनेची वातावरण निर्मिती केल्यानंतर त्यांना पुन्हा काँग्रेसच्या वातावरणात समरस होऊन बोलावे लागते. पक्ष बदलेल तशा भूमिका निवेदनाच्या माध्यमातून त्यांना बदलाव्या लागतात. शहरभर ते सायकलवरून फिरतात. जिल्ह्यात अन्य ठिकाणी सभा असेल, तर एसटीतून त्यांचा प्रवास सुरू असतो.