शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
2
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
4
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
5
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
6
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
7
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
8
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
9
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
10
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
11
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
12
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
13
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
14
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
15
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
16
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
17
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
18
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
19
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
20
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

राज्यकर्त्यांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही

By admin | Updated: February 25, 2015 00:07 IST

कवाडे : अधिवेशनादरम्यान जाब विचारू

कोल्हापूर : डॉ़ नरेंद्र दाभोलकर आणि गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांना शोधून काढेपर्यंत राज्यकर्त्यांना सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार नाही, अशी टीका पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार प्रा़ जोगेंद्र कवाडे यांनी केली़ प्रा़ कवाडे यांनी मंगळवारी पानसरेंच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले़ त्यानंतर कसबा बावडा येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेत ते बोलत होते़ प्रा़ कवाडे म्हणाले, महात्मा गांधी, डॉ़ नरेंद्र दाभोलकर आणि गोविंद पानसरे यांच्या हत्येसाठी धर्मांध प्रवृत्तींनी एक समान सूत्र वापरले आहे़ या प्रवृत्तीचे रखवालदार सत्तेत आहेत़ खुन्यांच्या पापांवर पांघरूण घातले जात असून महाराष्ट्राचे पुरोगामी आणि प्रतिगामी असे विभाजन करण्याचे षङ्यंत्र सुरू आहे़ ते रोखण्यासाठी पुरोगामी संघटनांनी प्रतिगामी संघटनांना सडेतोड उत्तर द्यावे़पानसरेंच्या हत्येच्या निषेधार्थ पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्यावतीने महाराष्ट्रभरात आंदोलन करण्यात येत आहे़ ९ मार्चला अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान शासनाला पानसरेंच्या हत्येचा जाब विचारणार आहे़ पानसरेंच्या हत्येकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी दिल्लीत ‘जंतर-मंतर’वर २५ मार्चला आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहितीही कवाडे यांनी दिली़ याप्रसंगी पानसरेंना श्रद्धांजली वाहण्यात आली़ यावेळी पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख नंदकुमार गोंधळी, जिल्हाध्यक्ष डी़ जी़ भास्कर, शहराध्यक्ष सोमनाथ घोडेराव, विद्याधर कांबळे, प्रकाश अंगरखे, सुरेश सावर्डेकर, लता नागावकर, अस्मिता दिघे, माधुरी कांबळे उपस्थित होेते.