शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
2
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
4
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
5
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
6
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
7
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
8
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
9
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
10
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
11
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
12
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
13
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
14
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
15
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
16
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
17
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
18
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
19
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
20
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

शासनाच्या धोरणाने नाराजी : लोकप्रतिनिधींच्या हक्कावर गदा आल्याचा सूर

By admin | Updated: November 25, 2015 00:32 IST

नगरसेवकांना बगल देऊन इचलकरंजीतील विकासकामे

इचलकरंजी : कृष्णा नळ पाणी योजनेकडील दाबनलिका बदलण्यासाठी २७ कोटी रुपये आणि शहराच्या बाह्यवळण मार्गासह प्रमुख रस्त्यांच्या मजबुती-डांबरीकरणासाठी मिळणारे २५ कोटी रुपये असा निधी शासनाच्या जीवन प्राधिकरण व बांधकाम खात्याकडून थेट खर्च होणार असल्याने नगरपालिकेतील पदाधिकाऱ्यांसह नगरसेवकांमध्ये नाराजी पसरली आहे. यामुळे पालिकेकडील लोकप्रतिनिधींच्या हक्कावर गदा येत असल्याची नगरपालिकेत जोरदार चर्चा आहे.साधारणत: अठरा वर्षांपूर्वी कार्यान्वित झालेल्या कृष्णा नळ पाणी योजनेला मजरेवाडी येथील कृष्णा नदीतून पाणी उपसा करण्यात येतो. तेथून इचलकरंजीपर्यंत १८.५ किलोमीटर लांबीची दाबनलिका टाकण्यात आली आहे. ही दाबनलिका जमिनीतून टाकण्यात आल्यामुळे ती खराब झाली आहे. त्यामुळे या दाबनलिकेला वारंवार गळती लागून नगरपालिकेचे मोठे नुकसान होते. म्हणून ही दाबनलिका बदलण्यासाठी शासनाकडे प्रयत्न चालू होते. राज्य शासनाने नगरोत्थान योजनेतून दाबनलिकेला २७ कोटी रुपये खर्चास परवानगी दिली आहे. मात्र, हे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत करण्यात येणार आहे.तसेच शहरातील बाह्यवळण मार्गासह विविध प्रमुख सोळा रस्त्यांचे मजबुतीकरण व डांबरीकरण करण्यासाठी ३२ कोटी रुपयांचा प्रकल्प शासनाकडे सादर करण्यात आला होता. त्यापैकी २५ कोटी रुपयास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली असून, त्याबाबतची पुढील कार्यवाही सुरू आहे. हे सुद्धा रस्ते मजबुतीकरण व डांबरीकरणाचे काम शासनाच्या बांधकाम खात्याकडून करण्यात येणार आहे. अशाप्रकारे कृष्णा नळ योजना व रस्त्यांच्या डांबरीकरणाचे असे मिळून होणारे ५२ कोटी रुपयांचे काम शासनाकडून थेट केले जात आहे. मात्र, नगरपालिका हद्दीमध्ये होणारी कामे पालिकेमार्फत निविदा काढून करण्याचा प्रघात आहे. त्याला आता फाटा दिला जात आहे. परिणामी नगरपालिकेतील लोकनियुक्त पदाधिकारी व नगरसेवकांना यामध्ये डावलले गेल्याने मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली आहे. (प्रतिनिधी)इचलकरंजीतील अतिक्रमित ४४ धार्मिक स्थळे काढून टाकणार इचलकरंजी : नगरपालिका हद्दीतील शासकीय व सार्वजनिक जागांवरील १२८ अनधिकृत धार्मिक स्थळांना इचलकरंजी नगरपालिकेने नोटीस बजावली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात येत असून, यापैकी ८४ धार्मिक स्थळे नियमितीकरणास पात्र, तर ४४ धार्मिक स्थळे काढून टाकण्यात येणार आहेत.शहरातील विविध परिसरांमध्ये ही धार्मिक स्थळे आहेत. त्यापैकी नियमितीकरणास पात्र असलेल्या प्रमुख स्थळांमध्ये दत्त मंदिर (शिक्षक कॉलनी), शिवमंदिर (मलाबादे शाळा पश्चिमेस), भवानी मंदिर (नारायणनगर), इस्लामपुरा मस्जिद (बेलबाग), सोनपावली मारुती मंदिर (सरस्वती मार्केट), बराखा प्रार्थना मंदिर (नेहरूनगर झोपडपट्टी), चर्च (नेहरूनगर झोपडपट्टी), मस्जिद (रेयॉन पेट्रोल पंपामागे), काळा मारुती मंदिर (गोकुळ चौक रोड), दत्त मंदिर (यशवंत कॉलनी, भिडे कार्यालय), शिवमंदिर (कमला-नेहरू सोसायटी), भगवान जिव्हाजी मंदिर (जिव्हाजी बॅँकेजवळ), मस्जिद (इंदिरानगर), कैलास मंदिर (लिंगायत समाज स्मशानभूमी), मस्जिद (जाधव मळा), हनुमान मंदिर (आसरानगर), गणपती मंदिर (मोठे तळे), विठ्ठल मंदिर (गेस्ट हाऊससमोर), भुवनेश्वरी मंदिर (आदर्श मंगल कार्यालयाजवळ), दुर्गामाता मंदिर (सटाले गल्ली, मंगळवार पेठ), आदींचा समावेश आहे.तसेच निष्कासनास पात्र असलेल्या प्रमुख धार्मिक स्थळांमध्ये वेताळ मंदिर (वेताळ पेठ चौक), दुर्गामाता मंदिर (जुना चंदूर रोड), गणपती मंदिर (गणपती कट्टा, कोल्हापूर बेकरी रोड), दत्तमंदिर (दत्तनगर), हनुमान मंदिर (जुना सांगली नाका चौक), प्रार्थना हॉल (कुष्ठरोगी वसाहत), मस्जिद (म्हसोबा गल्ली नं. १, विक्रमनगर), हनुमान मंदिर (गुजरी पेठ), गणपती मंदिर (डॉ.जोशी हॉस्पिटलसमोर), आदींचा समावेश आहे. (प्रतिनिधी)