‘गोकुळ’च्या ठरावधारकाचा कोरोनाने कोल्हापुरात मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2021 05:30 AM2021-04-18T05:30:06+5:302021-04-18T05:30:20+5:30

निवडणूक यंत्रणेसमोर पेच, कोल्हापूर जिल्हा दूध संघाची निवडणूक जाहीर झाल्यापासून अनिश्चिततेचे सावट राहिले आहे.

golkul dudh sangh election, one died with corona virus | ‘गोकुळ’च्या ठरावधारकाचा कोरोनाने कोल्हापुरात मृत्यू 

‘गोकुळ’च्या ठरावधारकाचा कोरोनाने कोल्हापुरात मृत्यू 

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : डोणोली (ता. शाहुवाडी) येथील सुभाष पाटील (वय ५४) यांचे शनिवारी कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात कोरोना संसर्गामुळे निधन झाले. ते ‘गोकुळ’चे ठरावधारक (मतदार) असल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. सध्या वीसहून अधिक ठरावधारक कोरोनाबाधित असल्याने निवडणूक यंत्रणेसमोर पेच निर्माण झाला आहे.


कोल्हापूर जिल्हा दूध संघाची निवडणूक जाहीर झाल्यापासून अनिश्चिततेचे सावट राहिले आहे. त्यात सत्तारूढ गटाने लढाई सुरू ठेवल्याने ठरावधारकांमध्ये संभ्रमावस्था आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाने निवडणूक प्रक्रिया सुरू असली, तरी कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. सत्तारूढ गटाने सर्वोच्च न्यायालयात निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यासाठी याचिका दाखल केली आहे. त्यावर सोमवारी सुनावणी होणार आहे.

मतदानासाठी १५ दिवस  
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यातच ‘गोकुळ’ निवडणुकीचा प्रचार सुरू आहे. या निवडणुकीसाठी गाठीभेटी सुरू असल्याने संसर्ग होण्याची भीती इच्छुक उमेदवारांसह ठरावधारकांमध्ये आहे. सध्या वीसहून अधिक ठरावधारक कोरोनाबाधित आहेत. ‘गोकुळ’च्या मतदानासाठी केवळ पंधरा दिवस राहिले आहेत.
 

Web Title: golkul dudh sangh election, one died with corona virus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.