होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 11:56 IST2026-04-14T11:54:41+5:302026-04-14T11:56:53+5:30

अमेरिकेने आमच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नये, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम होतील असं चीनने म्हटले होते.

US Iran War: America suffers setback in Hormuz blockade; Chinese tanker carrying methanol escapes safely | होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला

होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला

पाकिस्तानात इराणसोबत शांतता चर्चा अयशस्वी ठरल्यानंतर अमेरिकेने होर्मुझमध्ये नाकाबंदी करण्याची घोषणा केली होती. मात्र २४ तासांतच अमेरिकेची फजिती झाली आहे. इराणची परवानगी घेऊन होर्मुझ सामुद्रधुनीतून चीनचे एक जहाजात आरामात येथून मार्गस्थ झाले. या चिनी जहाजावर मेथेनॉल भरले होते, ज्याला अमेरिका रोखू शकली नाही. विशेष म्हणजे या जहाजावर काही वर्षापूर्वी अमेरिकेने निर्बंध लादले होते. तरीही चीनच्या या मेथेनॉल टँकरवर अमेरिका हल्ला करू शकली नाही.

माहितीनुसार, चिनी टँकर 'रिच स्टारी' केशम बेटाजवळून होर्मुझमधून पुढे गेला. सुरुवातीला या जहाजाला केशमजवळ थोड्या काळासाठी थांबवण्यात आले होते.  त्यानंतर त्याला सहजपणे होर्मुझमधून पुढे पाठवण्यात आले. मंगळवारी सकाळी हा टँकर ओमानच्या आखातात दिसला, त्याच भागात जिथे अमेरिकेने नाकेबंदी जाहीर केली आहे. 

२ प्रयत्नात होर्मुझ पार केले

चीनचा हा टँकर पार्शियन आखातातून होर्मुझजवळ आला होता. पहिल्या प्रयत्नात हा टँकर होर्मुझ ओलांडू शकला नाही. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात त्याने होर्मुझ पार केले. हा टँकर चीनच्या बंदरावर जाणार आहे. या जहाजाची कंपनी रिच स्टारी चीनची आहे. याआधी या कंपनीचे नाव फुल स्टार असं होते आणि ते हाँगकाँगचा झेंडा लावून चालत होते परंतु आता या टँकरवर चिनी ध्वज आहे. यापूर्वी चीनचे संरक्षण मंत्री ॲडमिरल डोंग जून यांनी अमेरिकेला होर्मुझच्या सामुद्रधुनीबद्दल इशारा दिला होता. अमेरिकेने आमच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नये, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम होतील असं चीनने म्हटले होते. आमचे इराणसोबत व्यापार आणि ऊर्जा करार आहेत. इतर कोणीही आमच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करणार नाही. होर्मुझची सामुद्रधुनी चीनसाठी खुली आहे असं डोंग जून यांनी स्पष्ट सांगितले.

दरम्यान, अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने अरबी समुद्र आणि ओमानच्या आखातात युद्धनौका तैनात केल्या आहेत. होर्मुझमधून जाणाऱ्या कोणत्याही जहाजावर अमेरिकी सैन्याकडून हल्ला केला जाईल असं जाहीर करण्यात आले आहे. इराणवर दबाव आणण्यासाठी अमेरिकेने होर्मुझच्या बाहेर जहाजे तैनात केली आहेत. ही एक यशस्वी योजना आहे. याच्या माध्यमातून इराण वाटाघाटीच्या टेबलावर येईल आणि आपण अण्वस्त्रे विकसित करणार नाही असे जाहीर करेल. आम्हाला इराणचे आर्थिक नुकसान करायचे आहे असं उपराष्ट्रपती जेडी व्हान्स यांनी सांगितले. 

Web Title : अमेरिकी नाकाबंदी विफल: चीनी टैंकर होर्मुज से सुरक्षित निकला

Web Summary : अमेरिकी नाकाबंदी के बावजूद, एक चीनी टैंकर मेथेनॉल लेकर ईरान की अनुमति से होर्मुज जलडमरूमध्य से सफलतापूर्वक निकल गया। पहले प्रतिबंधित 'रिच स्टारी' आगे बढ़ गया, जिससे अमेरिका का रणनीतिक जलमार्ग को नियंत्रित करने का प्रयास विफल हो गया, अमेरिकी चेतावनियों को धता बताया और चीन का प्रभाव प्रदर्शित हुआ।

Web Title : US Blockade Fails: Chinese Tanker Safely Sails Through Hormuz

Web Summary : Despite a US blockade, a Chinese tanker carrying methanol successfully navigated the Strait of Hormuz after Iran granted permission. The 'Rich Stari,' previously sanctioned, sailed onward, exposing the US's failed attempt to control the strategic waterway, defying American warnings and showcasing China's influence.