शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashish Shelar : "उद्धव ठाकरे लंडनच्या नालेसफाईची पाहणी करायला गेलेत का?"; आशिष शेलारांचा खोचक सवाल
2
दहावीच्या निकालासंदर्भात मोठी अपडेट! सोमवारी दुपारी लागणार निकाल, असा पाहा रिझल्ट
3
Fact Check: अमित शाह म्हणाले की, निवडणुकीत गॅरंटी दिल्यानंतर मोदी विसरतात?; 'तो' Video अपूर्ण
4
Hardik Pandya Divorce: नताशाला ७०% संपत्ती अन् 'कंगाल' पांड्या; हार्दिकबद्दल का रंगतेय चर्चा?
5
तुम्हीच ठरवा कोण जिंकतेय...! योगेंद्र यादवांच्या २६० च्या दाव्यावर प्रशांत किशोरांची प्रतिक्रिया, म्हणाले...
6
'वर्षभरापासून मी बेरोजगार आहे कारण...' रत्ना पाठक शाहांनी सांगितलं सत्य
7
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ३० मे पासून ५ टक्के, तर ५ जून पासून १० टक्के पाणी कपात
8
निवृत्त IAS अधिकाऱ्याच्या घरात चोरट्यांचा दरोडा, विरोध केल्याने पत्नीची हत्या
9
Gold Rates Today : ३ दिवसांत सोनं ₹२००० नं झालं स्वस्त, पाहा २४ कॅरेट Goldचा आजचा भाव
10
Fact Check: मनोज तिवारींनी लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकारला? जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागील सत्य
11
छत्तीसगड: दारुगोळा कारखान्यात भीषण स्फोट; 9 जणांचा मृत्यू झाल्याची भीती
12
मराठमोळ्या देवदत्त नागेचं नशीब उजळलं, थेट राजामौलींच्या सिनेमात चमकणार!
13
दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वेवर चालू ट्रकमधील सामानाची चोरी; धाडस पाहून लावाल डोक्याला हात
14
Arvind Kejriwal : "भाजपामध्ये उत्तराधिकारीवरून भांडण सुरू, मोदींना अमित शाहांना..."; केजरीवालांचा मोठा दावा
15
पाणी कसे वाचवावे? महापालिकेने दिल्या मुंबईकरांना टिप्स; शॉवर बंद, नळ सुरु ठेवून दात घासणे, दाढी करणे टाळा
16
हृदयद्रावक! वडिलांच्या तेराव्यासाठी आलेल्या मुलाचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
17
Vodafone Ideaच्या शेअरमध्ये ७% तेजी, एक्सपर्ट बुलिश; गुंतवणूकदारांच्याही उड्या
18
दुसऱ्या नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध, दलजीत कौरच्या घटस्फोटाचं कारण समोर; म्हणाली...
19
स्टार प्रवाह वाहिनीवरील या दोन लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप
20
हाताला सलाईन, रुग्णालयाच्या बेडवर झोपलेला दिसला मुनव्वर फारूकी, चाहते चिंतेत

Gokul Milk Election : पालकमंत्र्यांची झोप होण्यापुर्वीच महाडिक जिल्हा पिंजून काढतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2021 1:24 PM

GokulMilk Election Kolhapur- दहा वर्षांपूर्वी पालकमंत्री हे ज्येष्ठ नेते महादेवराव महाडिक यांच्यासोबत काम करत होते. आता थोडासा गॅप पडल्याने महाडिक यांच्या नित्यनियमांचा विसर पडला असेल. महाडिक यांची दुपारची झोप गेली असली तरी हरकत नाही. मात्र, पालकमंत्र्यांची रात्रीची झोप होण्याअगोदर ते जिल्हा पिंजून काढतात, हे ध्यानात ठेवावे, असा पलटवार जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शौमिका महाडिक यांनी केला.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांची झोप होण्यापुर्वीच महाडिक जिल्हा पिंजून काढतात शौमिका महाडिक यांचा पलटवार : दहा वर्षांच्या गॅपमुळे महाडिक यांच्या नित्यनियमांचा विसर

कोल्हापूर : दहा वर्षांपूर्वी पालकमंत्री हे ज्येष्ठ नेते महादेवराव महाडिक यांच्यासोबत काम करत होते. आता थोडासा गॅप पडल्याने महाडिक यांच्या नित्यनियमांचा विसर पडला असेल. महाडिक यांची दुपारची झोप गेली असली तरी हरकत नाही. मात्र, पालकमंत्र्यांची रात्रीची झोप होण्याअगोदर ते जिल्हा पिंजून काढतात, हे ध्यानात ठेवावे, असा पलटवार जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शौमिका महाडिक यांनी केला.गोकुळसाठी गुरूवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शौमिका महाडिक आल्या असता, त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शौमिका महाडिक म्हणाल्या, निवडणूक आली की कोणीही झोपत नाही, सत्ताधारी काय आणि विरोधक सगळ्यांनाच पायाला भिंगरी बांधून पळावे लागते. जिल्हा पिंजून काढावा लागतो. त्याप्रमाणे महादेवराव महाडिक काम करतात, त्यामध्ये एवढे विशेष काहीच नाही. दहा वर्षांपूर्वीचे महादेवराव महाडिक आणि आताचे यात फरक आहे. पालकमंत्री दहा वर्षांपूर्वी त्यांना ओळखत होते. आता दहा वर्षांचा गॅप पडल्याने कदाचित त्यांच्या नित्यनियमाचा विसर पडल्याचा टोलाही शौमिका महाडिक यांनी लगावला.विरोधकांनी मोट बांधली म्हणूनच रिंगणातमहादेवराव महाडिक, अरूण नरके व आमदार पी. एन. पाटील (मनपा) यांच्या नेतृत्वाखाली चाळीस वर्षे गोकुळची वाटचाल खूप चांगल्या पद्धतीने सुरू आहे. दिवसेंदिवस प्रगती वाढतच असून, हे कोणीही नाकारू शकत नाही. चाळीस वर्षांत मनपाच्या कुटुंबातील कोणीही सदस्य नव्हते, मात्र विरोधकांनी गोकुळवर कब्जा करण्यासाठी मोट बांधल्याने त्यांना टक्कर द्यायची असेल तर तीन नेत्यांच्या कुटुंबातील सदस्य सत्तेत असावेत, अशी मागणी ठरावधारक विशेष म्हणजे महिलांमधून झाल्यानेच आपण अर्ज दाखल केल्याचे शौमिका महाडिक यांनी सांगितले.

टॅग्स :Gokul MilkगोकुळElectionनिवडणूकkolhapurकोल्हापूरMahadevrao Mahadikमहादेवराव महाडिकSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटील