गोकुळ शिरगावच्या विकासासाठी कटिबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:42 IST2021-02-06T04:42:14+5:302021-02-06T04:42:14+5:30

गोकुळ शिरगाव: गोकुळ शिरगावच्या विकास कामासाठी निधी कमी पडू देणार नसून, मी या गावाच्या विकासासाठी कटिबद्ध आहे, अशी ग्वाही ...

Gokul is committed to the development of Shirgaon | गोकुळ शिरगावच्या विकासासाठी कटिबद्ध

गोकुळ शिरगावच्या विकासासाठी कटिबद्ध

गोकुळ शिरगाव: गोकुळ शिरगावच्या विकास कामासाठी निधी कमी पडू देणार नसून, मी या गावाच्या विकासासाठी कटिबद्ध आहे, अशी ग्वाही कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील यांनी दिली.

गोकुळ शिरगाव (ता. करवीर) येथील विविध विकास कामांचा शुभारंभ ऋतुराज पाटील यांच्याहस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच महादेव पाटील होते.

विविध विकास कामांचा शुभारंभ आमदार पाटील यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत, उपसरपंच संतोष कागले, ग्रामपंचायत सदस्य अजय टिपुगडे, अमित कागले, अमर चौगुले, अर्पणा मिठारी, लता पाटील, टी. के. पाटील, प्राचार्य के. डी. पाटील, नामदेव महाकवे, बाबूराव मिठारी, शंकरराव पाटील, सर्जेराव मिठारी उपस्थित होते.

फोटो : ०४ गोकुळ शिरगाव विकासकाम

कॅप्शन

गोकुळ शिरगाव (ता. करवीर) येथे विविध विकास कामांचा शुभारंभ आमदार ऋतुराज पाटील यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी सरपंच महादेव पाटील, जि. प. माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत उपस्थित होते.

Web Title: Gokul is committed to the development of Shirgaon