इचलकरंजीत आॅक्सिजन पार्कसाठी जागा देणार

By Admin | Updated: June 22, 2016 01:30 IST2016-06-21T23:47:56+5:302016-06-22T01:30:41+5:30

शुभांगी बिरंजे : मारवाडी युवा मंचचा कार्यक्रम उत्साहात

Give space for Ichalkaranjit Oxygen Park | इचलकरंजीत आॅक्सिजन पार्कसाठी जागा देणार

इचलकरंजीत आॅक्सिजन पार्कसाठी जागा देणार

इचलकरंजी : वृद्धांसाठी शहरात आॅक्सिजन पार्क निर्माण व्हावा, यासाठी मारवाडी युवा मंचला नगरपालिकेतर्फे सभेत ठराव करून जागा देण्यात येईल, असे आश्वासन नगराध्यक्ष शुभांगी बिरंजे यांनी दिले.
येथील घोरपडे नाट्यगृहात मारवाडी युवा मंचच्या २५व्या वर्षांतील पदार्पण, नूतन पदाधिकारी निवडी, तसेच गणराया अवॉर्ड २०१५-१६ चे वितरण अशा संयुक्त कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी सिनेअभिनेत्री महिमा चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती. नगराध्यक्ष बिरंजे यांनी मारवाडी युवा मंचला जागा दिल्यास ते निश्चितच आॅक्सिजन पार्क उभारतील, असा विश्वास व्यक्त केला. सिनेअभिनेत्री चौधरी यांनी मारवाडी युवा मंचच्या सामाजिक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी आपण अशा कार्यक्रमात उपस्थित राहतो.
माजी आमदार राजीव आवळे, नेमीचंद जांगेड, महावीर जैन, प्रदेश उपाध्यक्ष सुशील इनाणी, विभा पाटणी यांची प्रमुख उपस्थिती होती. मावळते अध्यक्ष दिनेश बांगड, सचिव गणेशकांत मालपाणी, कोषाध्यक्ष रामगोपाल वर्मा यांनी आपला पदभार नूतन अध्यक्ष रामकिशोर वर्मा, सचिव राधेश्याम झंवर, कोषाध्यक्ष प्रवीण पाटणी यांना सोपविला. नूतन निवडीमध्ये उपाध्यक्ष विनित तोष्णीवाल, हरीश बोहरा, अमित राठोड, मनोज चौधरी, सहसचिव अनिल जैन, हिरेन चोपडा, सनत दायमा, आदींसह कार्यकारिणीचा समावेश आहे.
कार्यक्रमास चंद्रप्रकाश छाजेड, पन्नालाल डाळ्या, नितीन धूत, हेमा डाळ्या उपस्थित होते. ओम पाटणी यांनी सूत्रसंचालन केले. (वार्ताहर)

Web Title: Give space for Ichalkaranjit Oxygen Park