शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
2
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
4
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
5
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
6
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
7
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
8
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
9
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
10
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
11
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
12
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
13
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
14
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
15
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
16
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
17
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
18
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
19
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
20
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

चौदा दिवसांत ‘एफआरपी’ द्या

By admin | Updated: November 25, 2015 00:45 IST

शिवसेना : ‘चक्का जाम’चा इशारा; प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा

कोल्हापूर : चौदा दिवसांत एकरकमी ‘एफआरपी’प्रमाणे शेतकऱ्यांना पैसे न देणाऱ्या कारखान्यांच्या संचालकांवर गुन्हे दाखल करा, त्यांच्यावर महसुली जप्तीची कारवाई करा, या मागणीसाठी मंगळवारी शिवसेनेने प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढला. कारखानदारांकडून शेतकऱ्यांची पिळवणूक सुरू असताना साखर आयुक्त बघ्याची भूमिका घेणार असतील तर कोल्हापूर जिल्ह्यात ‘चक्का जाम’ आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी शिवसेनेच्या वतीने देण्यात आला. मागील थकीत एफआरपी किती, अशी विचारणा करत चालू हंगाम सुरू होऊन महिना उलटला तरी अद्याप शेतकऱ्यांच्या हातात पैसे मिळालेले नाहीत. कायदा काय सांगतो? संबंधितांवर कारवाई का केली नाही? अशी विचारणा शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी केली. ज्यांनी चौदा दिवसांत एफआरपीप्रमाणे पैसे दिलेले नाहीत, त्यांचा लेखापरीक्षकांकडून अहवाल तयार करावा व त्यांच्या महसुली जप्तीची कारवाई करावी, अशी मागणी केली. तसेच कारखानदारांनी राजकारणासाठी कारखाने उद्ध्वस्त केल्याचा आरोप मुरलीधर जाधव यांनी केला. हंगामातील एफआरपी न देणाऱ्यांना गाळप परवाना दिलाच कसा? असा सवाल करत शुगरलॉबी सांगेल तसे साखर आयुक्त नाचत असल्याचा आरोप जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी केला. मंत्री समितीच्या निणर्यानुसार कारखान्यांना महिन्याची मुदत दिली आहे. त्या वेळेत एफआरपी न देणाऱ्यांवर आयुक्तांना दिलेल्या हमीपत्राचे उल्लंघन केल्याची कारवाई केली जाईल, असे प्रादेशिक साखर सहसंचालक सचिन रावळ यांनी सांगितले. चौदा दिवसांत एफआरपी न देणाऱ्या कारखान्यांवर गुन्हे दाखल केले नाही तर आगामी काळात ‘चक्का जाम’ आंदोलन करण्याचा इशारा संजय पवार यांनी दिला. शुभांगी साळोखे, सुषमा चव्हाण, बाजीराव पाटील, भिकाजी हाळदकर, प्रकाश पाटील, संभाजी भोकरे, तानाजी आंग्रे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)कर्जाचे व्याज हप्त्यानेच घ्यासाखरेच्या दराचे कारण सांगत एफआरपीचे तुकडे पाडणाऱ्या साखर कारखानदार व सरकारने आम्हाला हप्त्यावरच खते, बियाणे द्यावी. त्याचबरोबर आमचे पीक कर्जावरील व्याजही हप्त्यानेच घेणार का? असा संतप्त सवाल एका शेतकऱ्याने केला. ‘बिद्री’चा ५० हजारांचा बोनस?‘एफआरपी’ची चर्चा सुरू असताना करंजिवणे (ता. कागल) येथील शेतकरी लक्ष्मण लाड यांनी ‘बिद्री’ कारखान्याने अपात्र कर्जमाफीतील बेकायदेशीर ५० हजारांची कपात केल्याची तक्रार केली. हा बघा ‘बिद्री’ने मला दिवाळीत ५० हजारांचा बोनस दिल्याची पावतीच सहसंचालकांना दिली. याबाबत रितसर अर्ज करा, त्याची चौकशी केली जाईल, असे आश्वासन सहसंचालक रावळ यांनी दिले.