ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांना समान काम समान वेतन द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:33 IST2021-06-16T04:33:14+5:302021-06-16T04:33:14+5:30

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेमधील डॉक्टर, नर्सेस आदी ठोक मानधन कर्मचारी व आशा वर्कर्स यांना समान काम समान वेतन ...

Give equal pay for equal work to employees on bulk pay | ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांना समान काम समान वेतन द्या

ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांना समान काम समान वेतन द्या

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेमधील डॉक्टर, नर्सेस आदी ठोक मानधन कर्मचारी व आशा वर्कर्स यांना समान काम समान वेतन द्यावे किंवा राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन द्यावे अशी मागणी सोमवारी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे लाल बावटा युनियनमार्फत करण्यात आली.

लाला बावटा युनियनमार्फत आरोग्य मंत्री टोपे यांची भेट घेऊन निवेदन दिले. दहा वर्षापासून १० ते १५ हजार अशा अल्पशा पगारात सध्याच्या कोविड काळात इतर कुठलाही मोबदला न घेता काम करत आहेत तसेच आशा कामगारदेखील इतर फायदे न घेता आपले काम करत आहेत. त्यामुळे त्यांच्या पगारात वाढ व्हावी, ठोक मानधनावरील आरोग्य विभागातील सर्व कर्मचाऱ्यांना आरोग्य विमा लागू करण्यात यावा आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

या सर्व मागण्या चंद्रकांत यादव यांनी मंत्री टोपे यांना वाचून दाखविल्या. यावेळी डॉ. रेवती हिरेमठ, अर्चना तोडकर, जॉन भोरे, नम्रता मुळे, शुभांगी देसाई आशा वर्कर उज्ज्वला पाटील, नेत्रदीपा पाटील उपस्थित होते.

फोटो क्रमांक - १४०६२०२१-कोल-लाल बावटा

ओळ - कोल्हापूर महानगरपालिकेतील ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन चंद्रकांत यादव यांनी सोमवारी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना दिले.

Web Title: Give equal pay for equal work to employees on bulk pay