गणरायाचे जल्लोषी स्वागत

By Admin | Updated: September 6, 2016 01:15 IST2016-09-06T01:12:10+5:302016-09-06T01:15:34+5:30

पारंपरिक वाद्याला पसंती : राजारामपुरीत डॉल्बी वाजला; पण मर्यादेत

Ganaraya's cheerful welcome | गणरायाचे जल्लोषी स्वागत

गणरायाचे जल्लोषी स्वागत

कोल्हापूर : शहरासह जिल्ह्यात गणरायाचे जल्लोषी स्वागत करण्यात आले. दरवर्षी डॉल्बीचे आकर्षण असलेल्या राजारामपुरीत काही मंडळांचा डॉल्बी वाजला; पण तो मर्यादेत. पोलिस प्रशासनाच्या ‘नो डॉल्बी’च्या आवाहनाला काही मंडळांनी प्रतिसाद दिला. ढोलताशे, झांजपथक, अशी पारंपरिक वाद्ये आणून गणेश मिरवणुकीत रंगत आणली.
पोलिसांनी जर कोणी डॉल्बीची भिंत लावली, तर तो डॉल्बी जागेवर जप्त केला जाईल, असे कडक धोरण अवलंबिले होते. त्यामुळे सोमवारी गणेश आगमनावेळी राजारामपुरीतील गणेश मंडळे काय वाद्ये आणणार, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले होते. राजारामपुरी पोलिसांनी बैठकीवेळी प्रत्येक मंडळाला मिरवणूक रांगेचे टोकन दिले होते. त्यानुसार सोमवारी दुपारपासून बागल चौकाकडे व टाकाळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मंडळांनी नंबर लावून ठेवले होते. सायंकाळी राजारामपुरी येथील सातवी गल्ली येथील जिद्दी युवक संघटना या गणेश तरुण मंडळाची उद्घाटनानंतर मिरवणुकीला सुरुवात झाली. त्यानंतर राजारामपुरी तालीम, शिवप्रेमी गु्रप, भगतसिंग तरुण मंडळ, हनुमान तालीम मंडळांच्या गणेशमूर्ती रात्री मुख्य मिरवणूक मार्गात सहभागी झाल्या.


कडक बंदोबस्त अन् ध्वनिमापक यंत्र...
राजारामपुरी येथील गणेश मिरवणुकीसाठी तीन पोलिस व्हॅनसह पोलिस निरीक्षक अमृत देशमुख यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त होता. तसेच ध्वनीची तीव्रता मोजण्याचे ध्वनिमापक यंत्र पोलिसांकडे होते.

Web Title: Ganaraya's cheerful welcome