जुगार अड्डयावर छापा, बाराजणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:22 IST2021-03-14T04:22:46+5:302021-03-14T04:22:46+5:30

शहरातील बाळनगरमध्ये बाबू चांदसाब देवडी (वय ४८, रा. कुडचेमळा) याचे दुमजली घर आहे. घराच्या दुसऱ्या मजल्यावरील पत्र्याच्या शेडमध्ये तीनपानी ...

Gambling den raided, 12 arrested | जुगार अड्डयावर छापा, बाराजणांना अटक

जुगार अड्डयावर छापा, बाराजणांना अटक

शहरातील बाळनगरमध्ये बाबू चांदसाब देवडी (वय ४८, रा. कुडचेमळा) याचे दुमजली घर आहे. घराच्या दुसऱ्या मजल्यावरील पत्र्याच्या शेडमध्ये तीनपानी जुगार खेळत असताना पोलिसांनी छापा टाकला. यामध्ये घरमालकासह शंकर आप्पात्रा चौगुले (४६), श्रीकांत अनिल हावळ (३५, दोघे रा. बाळनगर), प्रकाश आण्णा चौगुले (६३, रा भोनेमाळ), आनंदा ईश्वरा भराडे (५८), दत्तात्रय धोंडिराम गानबोले (३० दोघे, रा. षट्कोन चौक), राजू बाळू पाटील (४२), शिवानंद आप्पान्ना चौगुले (४२, दोघे रा. तांबेमाळ), इम्रान दस्तगिर शेख (२७, रा. सुर्वेनगर), गणेश आण्णा भिसे (३५ रा. बंडगर मळा), विरूपाक्ष गुरुपाद कोष्टी (६५, रा बावणे गल्ली), महेश रामचंद्र धुमाळ (५०, रा. आयजीएम रोड) या बारा जणांना अटक करण्यात आली.

Web Title: Gambling den raided, 12 arrested